पंचायत समिती स्तरावरून शेतकर्यांना कृषी औजारे उपलब्ध करून देण्यात यावे -- विनोद पवार
किनवट तालुका हा आदिवासी आणि डोंगरी असल्याने याठिकाणी शेतकर्यांना चांगल्या दर्जाचे कृषी औजारे व्यवस्थित दरात उपलब्ध होत नाहीत.
यामुळे अनेक वर्षांपासून पंचायत समिती किनवट मार्फत शेतकर्यांना नांगर, वखर, कोळपे, स्प्रे पंप असे अनेक शेती औजारे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येत होती.
मात्र मागील काही काळापासून हे साहित्य पंचायत समिती स्तरावर भेटत नसल्याने शेतकर्यांना समस्या येत आहेत आणि सध्या शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीचा हंगाम सुरू होत आहे!
तेंव्हा आपण या निवेदनाची तात्काल दखल घेवून शेतकर्यांना पंचायत समिती स्तरावर नांगर, वखर,
स्प्रे पंप, कोळपे असे आवश्यक कृषी औजारे पंधरा दिवसांच्या आत पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून देण्यात यावेत अन्यथा शेतकर्यांना सोबत घेवून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल .
अशा आशयाचे निवेदन पंचायत समिती कार्यालय किनवट येथे खेडे, गाव विकास संघटनेच्या वतीने देण्यात आले