कोठारी-हिमायतनगर रस्त्याचे कृत्रिम संकट कधी नाहीसे होणार?
(राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास देतोय असह्य वेदना..)
किनवट (तालुका प्रतिनिधी) : देशाला विकासाकडे घेऊन जायचे असल्यास देश पातळीवर रस्ते भक्कम असावे लागतात हे जरी सत्य असले तरी
रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली किनवट-माहूर तालुक्याच्या नागरिकांना असह्य अशा वेदना सहन कराव्या लागत आहेत.
किनवट माहूर तालुक्यातील नागरिक सकाळपासून संध्याकाळपर्यंत महसूल अथवा कर हे भरत असतात परंतु त्या कराचा सदुपयोग
त्यांच्या सुखासाठी गेल्या अनेक वर्षापासून होतच नाही आणि कधी होणार हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला भेडसावत आहे.
त्यापैकीच एक कोठारी - हिमायतनगर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ए गेल्या सहा वर्षापासून हा रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली उकरून ठेवलेला आहे तो रस्ता मानवी जीवनाला संकटाकडे घेऊन जातच आहे
परंतु राजकीय क्षेत्रातील नेते हे मूग गिळून गप्प आहेत म्हणजे राजकीय क्षेत्र ही भांडवलदाराच्या अनियंत्रित सत्तेखाली आले की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए कोठारी ते हिमायतनगर या मार्गाचे पांग कधी फिटणार, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
गेली सहा वर्षे पावसाळ्यात चिखलमय तर हिवाळा, उन्हाळ्यात धुळीचा सामना करत या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.
इस्लापूर ते किनवट या ४५ किलोमीटर अंतराचा केवळ पाऊण तासाचा प्रवास, परंतु त्यासाठी दीड तासांहून अधिक वेळ लागत आहे.
नांदेड-भोकर -हिमायतनगर-
किनवट - माहूर- धनोडा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए ला मंजुरी मिळाल्यानंतर २३ ऑक्टोबर २०१७ रोजी त्याचे माहूर येथे भूमिपूजन झाले. या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर या
मार्गावर कोठारी ते हिमायतनगर हा मार्ग २७ जून २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, निर्धारित कालावधीत काम पूर्ण झाले नाही.
त्यामुळे हा मार्ग वादाच्या भोवऱ्यात अडकला. सुनील हायटेक आणि कृष्णानंद इन्फ्रा कंपनीला वेळोवेळी मुदतवाढ देऊनही राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पर्यंत झाले नाही.
गेल्या सहा वर्षांपासून या महामार्गाचे होणारे काम पाहता या मार्गाला कोणी वाली आहे की नाही.
आमदार भीमराव केराम व माजी आमदार प्रदीप नाईक या प्रश्नावर गप्प का आहेत. असा प्रश्न विचारला जात आहे. सहा वर्षांपासून
काम काही पूर्ण होत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात चिखलमय रस्त्याच्या व मार्ग ठप्प होण्याच्या समस्येला तसेच हिवाळा व उन्हाळ्यात धुळीचा सामना करत या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.
शेतातील पिके धुळीने माखून पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. २०२३च्या पावसाळ्यापूर्वी तुटक नाही.
तुटक झालेले काम पूर्ण होईल का? वन विभागाची अजून तरी परवानगी नसल्याचे सांगत जंगल भागातून जाणाऱ्या महामार्गाचे काम थांबूनच आहे.
सावरी, धानोरा, राजगड, सारखणी या जंगल रस्त्याला परवानगी नाही म्हणून काम काही हाती घेतलेले नाही.
मग कागदोपत्री तांत्रिकतेच्या आडून कंत्राटदाराचे अथवा इतर कोणी व्यक्तीचे भले करण्यासाठी किनवट- माहूर तालुक्याच्या व बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या यांना वेदना देणे कितपत योग्य आहे.
त्यामुळेच या कंत्राटदारावर नियंत्रण नसणे किंवा कंत्राटदार ती काम वेळेतच पूर्ण कराव नाही यासाठी तशी परिस्थिती निर्माण करणे या कृती करणाऱ्या वर योग्य ती कारवाई न झाल्यास येणारा भविष्यकाळ हा अंधकारमय होऊ शकतो हे मात्र निश्चित आहे असे सर्वसामान्य नागरिकांतून बोलल्या जात आहे.
विलास सूर्यवंशी किनवट
मो. नं.9922910080
(तालुका वृत्तान्त)