किनवट आगारातील चालक वाहकाचा प्रामाणिकपणा
22 हजार रोख रक्कम,तीन तोळे सोन्याची चैन,तीन सोन्याच्या अंगठ्या असलेली बॅग केली परत
💼💼💼💼💼
*त्या प्रवस्याच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर आलेला आनंद हीच आमची खरी कमाई*
🚌🚌🚌🚌🚌
*आज दि 23/05/2023 रोजी किनवट माहूर शटल कर्तव्यावर असणारे चालक श्री गजानन चन्द्रे आणि वाहक श्रीमती सीमा दस्तुरकर हे आपले कर्तव्य संपल्यावर गाडीत एक बॅग वाहक श्रीमती दस्तुरकर यांच्या नजरेस पडली.त्यांनी त्याविषयी चालकाला माहिती दिली.त्यानंतर त्यांनी बॅग मध्ये त्या प्रवस्याच्या मिळालेल्या मोबाईल नंबर वर संपर्क केला.तो बॅग विसरलेला प्रवासी किनवट मुंबई असा प्रवास करण्यासाठी माहूर ते किनवट बसने किनवट आले परंतु रेल्वे ची वेळ झाल्याच्या नादात बॅग बस मध्येच सोडून गेले.कर्तव्यवरील वाहक दस्तुरकर आणि चालक गजानन चन्द्रे यांनी प्रामाणिकपणे त्या बॅग मधील मिळालेल्या मोबाईल नंबर वर फोन करून प्रवास्याची बॅग परत केली,तेंव्हा त्या प्रवास्याच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले आणि त्यांनी किनवट आगारातील चालक वाहकांचे आभार मानले....*
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
🚌🚌🚌🚌🚌🚌🚌