Ticker

6/recent/ticker-posts

नगर परिषद किनवट येथे महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा 63 वा वर्धापनदिन निमीत्‍ताने ध्‍वजारोहनाचा कार्यक्रम प्रशासक तथा मुख्‍याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांच्‍या हस्‍ते नगर परिषद प्रांगणात सकाळी 7.10 वा संपन्‍न झाला



 
 
नगर परिषद किनवट येथे महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा 63 वा वर्धापनदिन निमीत्‍ताने ध्‍वजारोहनाचा कार्यक्रम प्रशासक तथा मुख्‍याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांच्‍या हस्‍ते नगर परिषद प्रांगणात सकाळी 7.10 वा संपन्‍न झाला.


ध्‍वजारोहनाच्‍या कार्यक्रमानंतर नगर परिषद कार्यालयास शहरातील नागरिकांना मुलभूत सोई-सुविधा पुरविण्‍याकरिता आरोग्‍य विभागासाठी शासनाकडून प्राप्‍त झालेले घंटागाडी व मिनी ट्रक्‍टरचा लोकापर्णनाचा कार्यक्रम संपन्‍न झाला. 

नगर परिषदेतील आरोग्‍य विभागातील सफाई कर्मचा-यांना सुरक्षा किटचे वाटप करण्‍यात आले. 

या सुरक्षा किटमध्‍ये सफाई कर्मचा-यांना गमबुट, जॅकेट, हॅन्‍डग्‍लोज व इतर सुरक्षा साहित्‍य देण्‍यात आले.त्‍यानंतर  या कामगारदिना निमीत्‍ताने सफाई कर्मचा-यांचा गौरव करण्‍यात आला. 


यावेळी नगर परिषदेचे माजी नगराध्‍यक्ष श्री. आनंद चन्‍नप्‍पा मच्‍छेवार व माजी नगर सेवक श्री. अभय महाजन  

यावेळी नगर परिषदेचे कार्यालय अधिक्षक श्री. चंद्रकांत दुधारे, लेखापाल  श्री. अनिल बिराजदार, भांडारपाल श्री. प्रशांत कुमरे, पा.पु. अभियंता श्री. अशोक भालेराव, 

विद्युत अभियंता   श्री. विनोद पवार, विकास योजनाप्रमुख श्री. अभिजीत मिरकले, रोखपाल श्री. अजहरअली ताहेरअली श्री. अल्ताफ श्री. पिल्लेवार  तसेच या कार्यक्रमास नगर परिषदेचे सर्व विभागप्रमुख, आरोग्‍य विभागातील कर्मचारी, 

अग्‍नीशमन विभाग व पाणी पुरवठा विभागातील कर्मचा-यांसह संपुर्ण कर्मचारीवृंद  यांची  उपस्थिती होते.