Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापूर पोलिसांची कामगिरी; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्ह्यासह पर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या अट्टल चोरट्यांना अर्धापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे


अर्धापूर पोलिसांची कामगिरी; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

अर्धापूर/खतीब अब्दुल सोहेल

नांदेड जिल्ह्यासह पर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या अट्टल चोरट्यांना अर्धापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

 त्याच्याकडून १७ दुचाकीं एकुण रक्कम ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दुचाकीसह अनेक गुन्ह्यांचा, आरोपींचा शोध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 अर्धापूर पोलिसांच्या कामगिरी बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.अर्धापूर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील दुचाकी चोरीच्या तपासातून १७ दुचाकी चोरींचा उलगडा झाला असून या कार्यवाही मध्ये जप्त केलेल्या वाहनांची चौकशी केली 

असता विविध पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी पोउपनि कपील आगलावे, पोउपनि बळीराम राठोड, आर. एस. नरवाडे, कांबळे, कल्याण पांडे, कोकाटे, भिमराव राठोड, राजु कांबळे, गुरूदास आरेवार,

 महेंद्र डांगे, घुले, डी. एम. जोशी, पोउपनी वेदपाठक, चापोउपनि बाबुराव जाधव यांनी कामगिरी केली असून पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.नांदेड जिल्हयात तसेच अर्धापूर पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने

 मा. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मा. अ. पो. अधीक्षक भोकर खंडेराय धरणे, मा. स. पो. अधीक्षक, उपविभाग नांदेड ग्रा. गोहर हसन व पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. अर्धापूर 

येथील पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे व त्यांचे पथकाला पो.स्टेल हाद्दीत चोरी गेलेल्या मोटारसायकल व चोरांचा शोध घेण्यासाठी आदेशित केल्याने पोउपनि कपील आगलावे यांनी पो.स्टे अर्धापुर गुन्हा नं. १४० / २०२३ कलम ३७९ भादवि मध्ये 

चोरीस गेलेली मोटार सायकलची फुटेज व गुप्त खबरीमार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपीचा कसोशीने शोध घेत असताना आरोपी लक्ष्मण मच्छिंद्रनाथ पोटे वय २३ वर्ष व रविराज हिरामण पोगे २६ वर्षे रा. येलकी ता.वसमत जि. हिंगोली व

 त्यांचा साथीदार तुकाराम उर्फ बबल्या उर्फ पल्लू लक्ष्मण पवार यांच्या ताब्यातुन १७ मोटारसायकल ११ लाख ३० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणात अनेक मोठ्या टोळीचा व अनेक गुन्ह्यांचा शोध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.