किनवट ब्राह्मण महासंघाच्या सोहळ्यात २ बटुंचे उपनयन संस्कार
किनवट - येथील ब्राह्मण महासंघाच्यावतीने आयोजित सामूहिक व्रतबंध सोहळ्यात मंगळवारी दि.२ शहरातील श्रीराम मंदिर सभागृहात दोघा बटुंचे उपनयन संस्कार करण्यात आले.
किनवट ब्राह्मण महासंघाने यंदापासून दरवर्षी सामूहिक व्रतबंध सोहळा घेण्याचा मानस केला.या सोहळ्यात मनस्व विनोद कुलकर्णी नांदेड व अविश सुरेश दाऊ वाशिम या बटुंवर पवनगुरु बोराळकर,सार्थक पत्की यांच्या पौराहित्यात उपनयन संस्कार करण्यात आले.यावेळी वेद शांतीपाठ,आशीर्वचन आदी विधी करण्यात आले.सोहळ्यास माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार,दिनकरराव चाडावार,के.मूर्ती,
साजीद खान,सुनील पाटील,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्मानीवार,भाजपचे शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, माजी उपनगराध्य व्यंकट नेम्मानीवार,अभय महाजन,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह संतोष तिरमनवार,विहिंपचे अनिरुद्ध केंद्रे,अक्षय भोयर,राजेंद्र चाडावार,पत्रकार फुलाजी गरड,किशन भोयर,
अनिल भंडारे,दत्ता जायभाये,माधव सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थितांचे स्वागत महासंघाचे अध्यक्ष आशिष देशपांडे,सचिव कचरू जोशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार म.आ.चौधरी,प्रदीप वाकोडीकर यांच्यासह गजाननराव लाठकर,रामराव पत्की,मधुसुदन पालमकर,श्रीकांत कुलकर्णी, सुनील पाठक,दिलीप पत्की,
सखाराम पांडे, बंडू महाराज जोशी,विश्वास कोल्हारीकर,समर्थ कुलकर्णी,कृष्णा देशपांडे,अविनाश दुर्गपुरोहित,विजय जोशी,प्रमोद पोहरकर,रोहन पांडे,प्रवीण कोल्हारीकर,प्रवीण आजेगावकर,सदाशिव जोशी
,रवींद्र चौधरी,विनोद पाटील,श्रीराम वळसंगकर,सुधीर गंगाखेडकर,गिरीश पत्की,गजानन भानोरकर, विजय पाटील,ओंकार पांडे,सुनील चांदुरकर,विमर्ष पाटील यांच्यासह महिला सदस्यांची उपस्थिती होती.