याव्दारे किनवट शहर, गोकुंदा शहर व किनवट तालुक्यातील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्याला सदर भागात महावितरण कडून खंडित वीज पुरवठा होत असल्याने आपल्या भागातील सर्वच नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
तरी या संदर्भात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करू अशा आशयाचे निवेदन
मी नुकतेच महावितरन किनवट यांना दिले होते. परंतु याचा काहीच परिणाम महावितरण च्या अधिकारी व कर्मचारी तथा प्रशासनावर झाला नाही.
यामुळे दिवसातून अनेकवेळा वारंवार वीज पुरवठा अशा उकाड्यात खंडित होत आहेत.
यामुळे मी याव्दारे नागरिकांना आवाहन करतो की, मी तर माझ्या पक्षाच्या लोकांना,
माझ्या समर्थकांना घेऊन आंदोलनाची रूपरेषा ठरवणार आहेच परंतु या खंडित वीजपुरवठाला त्रस्त नागरिकांनी
या आंदोलनात सहभागी व्हावे , उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आंदोलनाला भव्य रूप द्यावे
या करिता माझ्या 9822542037 या व्हॉट्स ॲपवर आपले समर्थन संदेश प्रसारित करावे. व मी आंदोलन संदर्भात माहिती प्रसारित करेल ती प्राप्त करून आंदोलनाला समर्थन द्यावे..
आपला
प्रकाश गब्बा राठोड,
तालुका अध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,
किनवट.