Ticker

6/recent/ticker-posts

किनवट प्रतिनिधी उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा या वर्षी सुद्धा कायम ठेवली आहे


किनवट प्रतिनिधी 
उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा या वर्षी सुद्धा कायम ठेवली आहे

 या शाळेचा विज्ञान शाखेचा निकाल 99.22 तर कला शाखेचा निकाल 77.94 इतका लागला आहे विज्ञान शाखेतून रुद्र नेमानीवार याने 85.67% गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे तर कला शाखेतून जाधव अंजली भास्कर या विद्यार्थिनीने ८०.८३ टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळवला आहे 

या यशस्वी विद्यार्थ्यांचे  संस्थाचालक व्यंकटराव नेम्मानीवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला 

उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला आहे या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे या शाळेतील एकूण 129 विद्यार्थ्यांनी  विज्ञान शाखेची परीक्षा दिली होती नऊ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह गुण प्राप्त केले आहे 55 विद्यार्थी प्रथम श्रेणीचे गुण प्राप्त केले आहे 

तर रुद्र कृष्णकुमार नेमानेवार या विद्यार्थ्यांनी85.67% गुण घेऊन विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे यांनी द्वितीय आर्यन नेम्मानीवार तर  गितेश राजु नार्लावार या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे विज्ञान शाखेबरोबरच कला शाखतील विद्यार्थ्यानीही गुणवत्तेत बाजी मारली आहे कला शाखेतील 195 विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी ८५ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीचे गुण प्राप्त केले आहे तर तीन विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे कला शाखेत अंजली भास्कर जाधव 

या विद्यार्थिनीने 77.94% गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार संस्थेचे सचिव तथा मुख्याद्यापक कृष्णकुमार नेमानेवार पर्यवेक्षक पहुरकर सर यांच्या सह विद्यार्थी व पालक वर्गाकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे


दरम्यान शाळेचा नावलौकिक वाढविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानेवार यांनी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला  यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते