Ticker

6/recent/ticker-posts

कोठारी सिंद ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमी योजना पांदण रस्त्याच्या कामात मशीनचा वापर तहसीलदाराचे दोषीवर कारवाई करण्याचे आदेश


 कोठारी सिंद ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमी योजना पांदण रस्त्याच्या कामात मशीनचा वापर

 तहसीलदाराचे दोषीवर कारवाई करण्याचे आदेश  

मांडवी  प्रतिनिधी 
 कोठारी सिंध येथील पांदण रस्त्याचे काम एमआरईजीएस या योजनेमधून मंजूर झालेले असून संबंधित काम गावातील  मजुरांकडून न करता मशीनच्या साह्याने करीत आहे त्यामुळे दैनंदिन बेरोजगाराना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या  सरपंच उपसरपंच व प्रतिनिधी ग्रामसेवक यांच्याविरुद्ध कारवाई करून गुन्हा नोंदविणे बाबत  

वरील प्रकरणात तात्काळ नियमानुसार उचित कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास व या कार्यालयास सादर करावा या कामे विलंब झाल्यास विलंबनाची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असे आदेश तहसीलदार किनवट यांनी  गट विकास अधिकारी पंचायत समिती किनवट यांना देण्यात आलेले आहे


 उपरोक्त कोठारी सिंध येथे दोन पादन रस्त्याचे कामे मंजूर झालेले आहे   ग्रामपंचायत कोठारी सिंध येथील जवळपास 300 मजुराने मा. तहसीलदार साहेब किनवट यांना 27/ 3/2023 व 23 /3/2023 रोजी हाताला काम उपलब्ध करून देण्याची निवेदन दिले 

 13/ 4/ 2023 रोजी कोठारी ग्रामपंचायत कार्यालय  येथे रोजगार हमी योजने  अंतर्गत हाताला कामे उपलब्ध करून देण्यासाठी बेरोजगाराने अर्ज केलेला होता. 

संबंधित काम महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून असल्याने काम  मजुराच्या साह्याने करून गावातील बेरोजगार मजुरांना  कडून कामे करून घेणे बंधनकारक आहे असे असताना गावातील जवळपास 300 मुजराने हाताला काम द्या अशी विनंती करून कामाची मागणी केली 

असता सुद्धा संबंधित कामे आणणाऱ्या गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हे केवळ मशीनच्या साह्याने कामे करून आम्हा रोजगारांना बेरोजगार  ठेवून आधिक रुपये कमविण्याच्या हेतूने हे काम मशीने करीत आहे. संबंधित कामाचे जि.ओ. टेकिंग दिनांक 30/3/2023 रोजी

 बंधित कामाचे जि.ओ. टेकिंग दिनांक 30/3/2023 रोजी केले आहे व  दिनांक 6/4/2023 ला कामाची सुरुवात मशीनच्या साह्याने करून जवळपास एकाच दिवसात अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम ट्रॅक्टरने केले

 व पोकलेन मशीनच्या साह्याने नालीचे काम केले आहे.  तसेच खोटे मस्टर दाखवून म्हणजे त्यांच्याच कुटुंबातील व त्यांच्या जवळचे नातेवाईक

 यांच्या नावे मस्टर दाखवून लाखो रुपये लूट करणाची शंका आहे व आम्ही संदर्भ  निवेदनाद्वारे  रोजगार मागणार हे बेरोजगार रोजगारा पासून  वंचित राहू असे दिसत आहे त्यामुळे अशा भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्या  विरूद्ध, 

शासनाची, गावातील मजुरांची, मनरेगा योजनेचे कायद्याची पायमल्ली करणाऱ्या  वर पो. स्टे.ला गुन्हा नोंदवून कारवाई  व्हावी व यांना पदावरून काढून टाकण्याची कारवाई करावी अशी मागणी आहे. 
 

वरील संदर्भीयवरुण मांडवी परिसरामध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये सर्रासपणे मशीनरीचा वापर केला जात असल्यामुळे 

मांडवी परिसरातील बेरोजगारावर उपासमारीची वेळ येत असून मांडवी परिसरातील मजूर वर्ग हे कामासाठी जवळील तेलंगणा राज्यात जात असल्यामुळे तेलंगणा राज्यात

  रोजगारासाठी रोजगार स्थलांतरित होत आहे यामुळे परिसरातील गावाची तेलंगाना राज्यात जाण्याची मानसिकता तयार होत आहे. 

महाराष्ट्र सरकार रोजगार हमी योजनेअंतर्गत खरच मुजरांना काम द्यावे व स्थलांतरित बाबीकडे शासनाने गांभीर्याने पाहावे अशी मागणी होत