Ticker

6/recent/ticker-posts

*सारखनी येथील शेत गट क्र. 167 ग्रा.प.मालमत्ता क्र.279 या जमिनीला वेगळे वळण दावे प्रति दावे**प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही ग्रामपंचायत ने केली कारवाई**गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पालन करून अतिक्रम काढले सरपंच सूर्यभान सिडाम


*सारखनी येथील शेत गट क्र. 167 ग्रा.प.मालमत्ता क्र.279 या जमिनीला वेगळे वळण दावे प्रति दावे*

*प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही ग्रामपंचायत ने केली कारवाई*

*गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पालन करून अतिक्रम काढले सरपंच सूर्यभान सिडाम*



किनवट तालुक्यातील सारखणी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले भूखंड शेत गट क्रमांक 167 क्षेत्र 1 हे 14 आर ज्यांचे ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक 279 प्रमाणे असून सदरील मालमत्तेविरुद्ध दि.08/06/2023 रोजी ग्रामपंचायत सारखनी येथे नोंद असून या प्रकरणा विषयी सपना अरुण राठोड यांनी असा दावा केला की सदरील मालमत्ता ही माझ्या मालकीची असल्याच्या शेत सर्वे नंबर 167 सातबारा असून यासंदर्भात ग्रामपंचायत सारखणी गटविकास अधिकारी किनवट यांचे कडे न्याय मागणीसाठी अर्ज केला होता यावरून ग्रामपंचायत सारखणी आणि गटविकास अधिकारी किनवट यांना एका निवेदनाद्वारे सदरील अतिक्रम करणाऱ्या चौकशी करून आरोपी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केल्या यावरून गटविकास अधिकारी  किनवट यांनी ग्रामपंचायतला पत्र दिल्यावरून ग्रामपंचायत सारखणी यांनी दि. 08/06/2023 रोजी पोलीस स्टेशन सिंदखेड बंदोबस्तासाठी लागणारी रक्कम भरून फौज फाटा घेऊन फौजदार व अन्य कर्मचारी किनवटचे गटविकास अधिकारी  सारखणी येथील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ व तक्रार धारक यांच्या उपस्थितीत सदरील भूखंड गट क्रमांक 167  सातबारा येथील जागेत असलेले अतिक्रम काढण्यात आले आहे तर याविषयी ही माहिती प्रतिवादि  शरद चंद्रभान राठोड यांना माहिती झाल्या वरून यांनी मला कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता बेकायदेशीरपणे माझ्या मालमत्तेवर घुसून मौजे सारखणी तालुका किनवट येथे शेत गट क्रमांक 167 क्षेत्र 1 ते 44 आर ज्यांचे ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक 279 असे आहे हे माझ्या मालकीची व ताब्यातील मालमत्ता असून सदर मालमत्तेत माझे बांधलेले टीनशेड त्यामध्ये एक कपाट ज्यामध्ये माझे आर्थिक व्यवहार विषयांचे अत्यंत महत्वपूर्ण कागदपत्रे मूल्यवान वस्तू व तसेच इतर साहित्य त्या ठिकाणी होते शिवाय या मालमत्तेत नावे असलेले विद्युत मीटर माझे नावाचे  दोन नामफलक इत्यादी साहित्य होते परंतु दि.08/06/2023 र रोजी अंदाजे दुपारी 2. वाजता सुमारास मी माझ्या मालमत्तेची पाहणी केली असता त्या ठिकाणी असलेले माझे कुलूपबंद टीनशेड  त्यामधील इतर मूल्यवान साहित्य कागदपत्रे असे कोणतेच वस्तू तिथे मला आढळून आले नाही त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांकडून मला असे समजले की ग्रामपंचायत सारखणी चे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक गटविकास अधिकारी
 यांनी काही पोलिसांच्या मदतीने माझ्या मालमत्तेची कुलूपबंद टीनशेड कपाट नामफलक महत्वपूर्ण कागदपत्र इत्यादी माझ्या समतीशिवाय व मला कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना दिल्या न देता अथवा कुठल्याही प्रकारची नोटीस तामील न करता माझ्या मालमत्ता ताब्यात असताना सुद्धा गटविकास अधिकारी किनवट व ग्रामपंचायत सारखणी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक 

यांनी अरुण चंद्रभान राठोड यांच्या सांगण्यावरून व संगणमत करून बेकायदेशीरपणे माझ्या मालमत्तेत घुसून माझे तार कंपाउंड तोडून कुलूपबंद टीनशेड कपाट दोन नामफलक इत्यादी लुटून नेले आहे ग्रामपंचायत सारखणी चे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव पंचायत समिती 

किनवट इतराविरुद्ध माझ्या मालकी व ताब्यातील मालमत्ता शासकीय अथवा ग्रामपंचायतच्या मालकीची नसताना व तसेच मी या मालमत्तेत कुठल्याही प्रकारचे अतिक्रमन केले नसताना सुद्धा पंचायत विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी व तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी माझ्या मालमत्तेत बेकायदेशीर रित्या प्रवेश करून मला आर्थिक व मानसिक त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून साहित्याची लूट केली वास्तिक पाहता कायदेशीर बाबी नुसार त्यांना माझ्या मालमत्तेत प्रवेश करण्याच्या कुठल्याही अधिकार नाही शिवाय जर ही 

त्यांची माझ्या विरुद्ध केलेली कारवाई असेल तर त्यांना न्यायालयाच्या हुकूमनान्या शिवाय माझ्या मालमत्तेत अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करणे म्हणजे दिवसा ढवळ्या कायदा सुव्यवस्थेला आव्हान देण्यासारखे आहे तत्पूर्वी माझ्या याच मालमत्तेत अशाच प्रकारचे बेकायदेशीर रित्या प्रवेश अरुण चंद्रभान राठोड यांनी केला होता त्यावेळेस मी मान्य जिल्हा सत्र न्यायालय नांदेड 

येथे प्रकरण दाखल केले आहे व ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे माझ्या मालमत्तेत बेकायदेशीर प्रवेश करून माझ्या मालकीच्या मूल्यवान वस्तू व कागदपत्र लुटून नेणाऱ्या संबंधिताविरुद्ध भांदवीच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून मला न्याय द्यावा असा 

अर्ज दि.08/06 2023 रोजी सिंदखेड पोलीस स्टेशन येथे व दि.09/06/2023 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सिंदखेड यांना भेटून देण्यात देण्यात आला असता सदरचा अर्ज शिवकरण्यास नकार दिला म्हणून सदरील अर्ज उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांना तक्रार धारक शरद चंद्रभान राठोड यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे

 या प्रकरणा विषयी माहिती घेतली असता संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन सारखणी व सिंदखेड पोलीस स्टेशनचे सपोनी सुशांत किनगे यांची प्रतिक्रिया घेतली असता ग्रामपंचायतच्या पत्रानुसार आम्ही बंदोबस्त देऊन अतिक्रम काढण्यास कारवाई केलीआहे सपोनी सुशांत किनगे 

यांनी असे म्हणाले व या संदर्भात गटविकास अधिकारी किनवट पुरुषोत्तम वैष्णव यांची प्रतिक्रिया त्यांना विचारलं असतात सदरील प्रकरणाची पूर्ण माहिती न घेता व प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना तुम्हाला अतिक्रम काढण्यास अधिकार आहेत का असे विचारले असतात ते म्हणाले आम्हाला ग्रामपंचायत सारखणी   यांनी पत्र दिल्यावर अतिक्रम काढण्यासाठी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे मला ग्रामपंचायत सारखनी यांनी सांगितले नाही  

आमच्या लक्षात आलं नाही या विषयी सविस्तर माहिती व बाईट (मुलाखात) ग्रामविकास अधिकारी हनुमंत वाडेकर यांना विचारून सदरील प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन पुढील कारवाई करावी असे गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव पंचायत समिती किनवट यांनी बोलताना म्हणाले.

गटविकास अधिकारी यांनी सांगितल्यानुसार येथील ग्रामविकास अधिकारी हनुमंत वाडेकर यांना या या प्रकरणाची माहिती घेतली असतात ते म्हणाले की याबाबत मी काही बोलू शकत नाही किंवा मीडिया पुढे मी येऊ शकत नाही त्यांनी आपले हात वर केले 


या विषयी सदरील प्रकरण काय आहे हे कोणी सांगायला तयार नाही नेमके याबाबत कुठेतरी पाणी मुरत या वरून  दिसुन येते व सपना अरुण राठोड व शरद चंद्रभान राठोड या दोघांच्या वादी प्रतिवादी महसूल विभागांचे असल्याचे हे प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ठ असल्याने नेमकी भूमिका काय घेणार या प्रकरणाकडे गावकऱ्यांचे व जनतेचे लक्ष लागले आहे