Ticker

6/recent/ticker-posts

किनवट गोकुंदा येथिल सिद्धार्थनगरातील महिलांची मिटींग आटोपूर परत जात असतांना स्पंदण फायनाॅंस कम्पनीचे प्रतिनिधी वैभव सुधाकर रोडगे जवळील १ लाख २५ हजार रोखडची बॅग हिसकाऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा करण्याचा प्रयत्न केला


किनवट  गोकुंदा येथिल सिद्धार्थनगरातील महिलांची मिटींग आटोपूर परत जात असतांना स्पंदण फायनाॅंस कम्पनीचे प्रतिनिधी वैभव सुधाकर रोडगे  जवळील १ लाख २५ हजार रोखडची बॅग हिसकाऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा करण्याचा प्रयत्न केला. 

परंतू झालेल्या झटापटीत रोडगेंनी स्वत:चा आणि पैशाचा बचाव करण्यासाठी पळतांना त्यांच्यावर चोरट्यांनी छर्‍याच्या बंदूकीने वार करुन पळून  गेल्याची पुन्हा एकदा आज (१० जून) रोजी सकाळी घटना घडली.
     
 गोकुंद्यातील सिद्धार्थनगरातील  स्पंदना बचत गटाची आज मिटींग होती.

 कम्पनीचे प्रतिनिधी वैभव रोडगे मिटींग आटोपून परत जात असतांना बीपी महाविद्यालयाच्या पाठीमागच्या परिसरातील लोकवस्ती विरळ असलेल्या रस्त्याने जात असतांना

 त्यांना एकट्यांना रस्त्यात आडऊन १ लाख २५ हजाराची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. 

प्रसंगावधान राखत रोडगेंनी त्या दोघांशी झटापट करीत पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांच्यावर छरा नकली बंदूक नि  गोळ्या झाडल्या.

त्यात रोडगेंच्या मांडीला दुखापत झाली. गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन 

पुढील उपचारासाठी यवतमाळला हलवण्यात आल्याचे सूत्र सांगतात. किनवट पोलीसांना खबर मिळताच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सपोनि.वाठोरे, पोउनि.सावंत यांनी घटनास्थळ गाटून पहाणी केली. 

वृत्त पाठवेपर्यंत गुन्हानोंदीची प्रक्रिया चालू होती