Ticker

6/recent/ticker-posts

किनवट नगरीचे ज्येष्ठ समाजसेवी सच्चिदानंद पवार गुरु स्वामी यांना आमंत्रित करून त्यांच्या कार्याची दखल सबंध महाराष्ट्रामध्ये घेण्यात आल्याने श्री सच्चिदानंद पवार गुरु स्वामी यांच्यामुळे किनवट शहराची मान उंचावली आहे


किनवट ता. प्र. दि. 23 रामभाऊ माळगे प्रबोधिनी मुंबई येथे समाजासाठी आपण काही देणे लागतो या निस्पृह भावनेतून कोणत्याही संघटने शिवाय एकला चलो रे या संघर्षातून समाजसेवेचा वेढा उचललेल्या समाजसेवी चे संमेलन भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार विनय सहस्त्रबुद्धे समाजसेवक गिरीश प्रभुणे श्रीकांत पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले असून या अशा अलौकिक कार्यक्रमांमध्ये आपल्या

 किनवट नगरीचे ज्येष्ठ समाजसेवी सच्चिदानंद पवार गुरु स्वामी यांना आमंत्रित करून त्यांच्या कार्याची दखल सबंध महाराष्ट्रामध्ये घेण्यात आल्याने श्री सच्चिदानंद पवार गुरु स्वामी यांच्यामुळे किनवट शहराची मान उंचावली आहे.

मुंबई येथील सुप्रसिद्ध प्रबोधिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामभाऊ माळगी या जगविख्यात प्रबोधिनी मध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून विविध प्रकारे समाजसेवेचा वसा उचललेल्या एकांडया समाजसेवींना आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या कार्यामागे कोणता विचार होता त्यांना कोणत्या समस्या 

त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्भवल्या तसेच आगामी काळात त्यांना काय मदत होऊ शकेल या सर्व बाबींवर सखोल चर्चा व्हावी व विविध जाणत्या व्यक्तींचे मनोगत अनुभव एकमेकांना माहीत व्हावे 

या हेतूने एक सुंदर असे संमेलन रामभाऊ माळगी प्रबोधिनी मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते यामध्ये सच्चिदानंद पवार गुरु स्वामी 

यांचे कार्य हे समाजात समरसता निर्माण करणे म्हणजे समाजात प्रचलित वर्णव्यवस्थे ला नाकारून सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समान स्थान देत ईश्वराची भक्ती करण्याचा अधिकार त्यांनी मिळवून दिला

 याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ते नित्यनेमाने मागील 28 वर्षापासून श्री अय्यप्पा स्वामी दीक्षा ही घेतात व त्यांच्या सानिध्यात सुमारे 100 ते 200 विविध जाती धर्मातील युवकांना ही आपल्या दीक्षा काळात अयप्पा स्वामी यांच्या पूजेत सामावून घेतात. 

तसेच ते हनुमान दीक्षा श्री साई दीक्षा ही वर्षभर आयोजित करतात तर काशी विश्वनाथ काशी विश्वनाथ यात्रेला समाजातील विविध वर्गातील नागरिकांना ते वर्षभर घेऊन जातात यातून त्यांचे कार्य हे वर्णव्यवस्थेला नाकारत आहे यामुळे त्यांचा येथे सत्कार करण्यात आला.


मागील कित्येक वर्षापासून किनवट शहरातील गरजू व्यक्तींना नित्य अन्नदान या योजनेअंतर्गत ते घरपोच मोफत अन्नपुरवठा अन्न गरमागरम शिजवलेले असते त्यांनी कोरोना काळामध्ये सुद्धा अनेक गरजू व्यक्तींची मदत केलेली आहे 

तसेच प्रशासनाची देखील खूप मोठी मदत केलेली आहे यामुळे त्यांच्या या कार्याची दखल रामभाऊ माळगी प्रबोधिनी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात घेण्यात आली 

व त्यांचा येथे भव्य सत्कार करण्यात आला यामुळे किनवट शहराचे प्रतिनिधित्व अशा महान व्यक्तींच्या कार्यक्रमाला लाभले यामुळे सहाजिकच किनवटची मान उंचावल्या गेली