Ticker

6/recent/ticker-posts

तालुका आशा समूह संघटक जनार्दन काकडे यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल का?तालुका प्रालुका आरोग्य विभागामार्फत शासनाच्या वतीने तालुक्यातील अति दुर्गम भागात वास्तव करून राहणाऱ्या विशेषता गर्भवती महिलांच्या


तालुका आशा समूह संघटक  जनार्दन काकडे यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल का?


तालुका प्रतिनिधी
किनवट तालुका आरोग्य विभागामार्फत शासनाच्या वतीने तालुक्यातील अति दुर्गम भागात वास्तव करून राहणाऱ्या विशेषता गर्भवती महिलांच्या आरोग्याची संपूर्ण देखभाल करून बाळातपणापर्यंत

 सर्व प्रकारच्या सुविधा देणाऱ्या आशा वर्कर यांना गट समूहक संघटक श्री जनार्दन काकडे यांच्या त्रासाला कंटाळून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे न्याय मिळणे संबंधित तक्रारी अर्ज दिला.


किनवट तालुका हा अति दुर्गम व डोंगराळ भाग जास्त प्रमाणात असून रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात असल्याने शासन आपल्या दारी यानुसार शासनाच्या वतीने खेड्यापाड्यापर्यंत तांडा वाडी वस्त्यावर अतिशय हालाकीच्या परिस्थितीत मोलमजुरी करून दोन वेळच्या अन्नासाठी व मूलभूत सुविधा पदरात पाडून घेण्यासाठी अहोरात्र काम करत असताना 

त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने तालुका आरोग्य विभागामार्फत कामावर मानधन घेऊन आरोग्याची सुविधा घरापर्यंत पोहोचविणाऱ्या आशा वर्कर यांच्या कामाची स्तुती केली तेवढी कमी आहे परंतु आशा वर्कर 

यांनी काम केल्यावर कामाचा मोबदला मिळविण्यासाठी तालुका आरोग्य कार्यालयात गटसमूहक हे पद कार्यरत असून काम केलेले मानधन मिळवण्यासाठी

 गट समूहकाची त्यांना पहिले अशील शब्दात बोलून अपमानित करतात नंतर पैशाची मागणी करतात असे निवेदनामध्ये नमूद आहे सुट्टीच्या दिवशी विनाकारण बोलवतात या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन आशा वर्कर 

यांना न्याय मिळेल का असा प्रश्न स्वयंसेविका यांना तूर्तास तरी पडला असून निवेदनावर माला शंकर बावणे सह इतर आशा वर्कर यांच्या स्वाक्षऱ्या असून दोषी जनार्दन काकडे यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल काय असा प्रश्न आशा वर्कर यांना पडला आहे