Ticker

6/recent/ticker-posts

शिवाजी राजे गार्डनचे संचालक संजय कदम यांच्यावर हल्ला.किनवट येथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या घोटी येथील छत्रपती शिवाजी राजे गार्डन चे संचालक तथा आदर्श शेतकरी संजय चंपतराव


शिवाजी राजे गार्डनचे संचालक संजय कदम यांच्यावर हल्ला.
किनवट 
येथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या घोटी येथील छत्रपती शिवाजी राजे गार्डन चे संचालक तथा आदर्श शेतकरी संजय चंपतराव कदम यांचेवर जमिनीच्या वादातून दिनांक चार जून रोजी सकाळी अकरा वाजता कृष्णा चंपती कदम,

अविनाश कृष्णा कदम, घोटी.कैलास विठ्ठल कराळे, विनोद विठ्ठल कराळे,रणजीत कराळे कमठाला. यांनी एकत्र येत मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

दिनांक 4 जून रोजी मी घोटी येथील शेत सर्वे नंबर 171 मध्ये नांगरणी करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी वरील मंडळी जमवून होती. 

माझ्याजवळ येत नांगरणी कसा करतो म्हणून दमदाटी करत एकटा असल्याचे संधी पाहून माझ्यावर हल्ला करीत बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मी आरडाओरड केली 

असता शेता शेजारील शेतकरी धावत येऊन मला दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला.वरील मंडळींनी सूडबुद्धीने माझ्या शेतातील पेरणीसाठी आणलेले बी, बियाणे शेतातील मंगल कार्यालयाच्या खुर्च्या, 

स्प्रिंकलर, पाईप, जाळून माझे मोठे आर्थिक नुकसान केले . ट्रॅक्टर आणि जीप या महागड्या वाहनाची मोठी नुकसान केली. 

आणि पुढे याला पाहून घेतो मनत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती पोलिस अधीक्षक नांदेड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी किनवट यांना दिल्याचे नमूद आहे.