Ticker

6/recent/ticker-posts

@गोदावरी अर्बन सहकार सूर्य मुख्यालयास भेट उद्योग मंत्री मा.ना.श्री उदयजी सामंत यांनी आज गोदावरी अर्बन संस्थेच्या तरोडा नाका येथील सहकारसूर्य मुख्यालयास भेट दिली


@गोदावरी अर्बन सहकार सूर्य मुख्यालयास भेट 
उद्योग मंत्री मा.ना.श्री उदयजी सामंत यांनी आज गोदावरी अर्बन संस्थेच्या तरोडा नाका येथील सहकारसूर्य मुख्यालयास भेट दिली. 

गोदावरी परिवाराच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. 

गोदावरी अर्बनने अल्पावधीत सहकार क्षेत्रात घेतलेली झेप बघून त्यांनी समाधान व्यक्त केले आणि गोदावरी अर्बन परिवाराच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 याप्रसंगी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, गोदावरी अर्बन मुख्यालयाचे विजय शिरमेवार, महेश केंद्रे, श्री संगावार, 

अविनाश बोचरे व गोदावरी अर्बनच्या मुख्यालयातील अधिकारी आणि मुख्य शाखेतील कर्मचारी यांची उपस्थिती होती.