Ticker

6/recent/ticker-posts

संथागार वृद्धाश्रमात पाटील यांचा वाढदिवस गाण्याच्या मैफीलीत साजरा.किनवट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अजिंक्य सेवाभावी संस्था द्वारा संचलित असलेले संतागार वृद्धाश्रम


संथागार वृद्धाश्रमात पाटील यांचा वाढदिवस गाण्याच्या मैफीलीत साजरा.
किनवट l प्रतिनिधी.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अजिंक्य सेवाभावी संस्था द्वारा संचलित असलेले संतागार वृद्धाश्रम हे शहराच्या सौंदर्यात भर टाकून विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीचा यथोचित सत्कारासह वाढदिवस साजरा करून मान्यवरांचा सन्मान करण्याची

 एक वेगळी परंपरा वृद्धाश्रमाचे संचालक माजी नगराध्यक्ष तथा जागतिक धम्म परिषदेचे मुख्य आयोजक अरुण दादा अळणे यांनी राबवून शहराच्या सौंदर्यात एक प्रकारची भर टाकली आहे. 

किनवट पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अनिल भंडारे आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता जायभाय यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाटील फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा 

किनवट पत्रकार संघाचे तालुका सचिव दिलीप पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी गायक तथा पत्रकार अनिल भंडारे व दत्ता जायभाय यांनी अतिशय बहारदार आवाजात गाण्याची सादरीकरण करीत उपस्थित वृद्धाश्रमातील व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणीत केला. 

वयोवृद्ध व्यक्तीची आपलेपणाने सांभाळणे त्यांच्या सुख दुखात मायेचा जिव्हाळा पाहून अरुणावळे 

यांच्या कार्य बद्दल नांदेड जिल्ह्यात इतर राज्यातही कुतूहल निर्माण झाल्याने शहरात आलेल्या नामांकित व्यक्ती संतागार वृद्धाश्रमाला भेट दिल्याशिवाय जात नाही ही ओळख संथागार निर्माण केली आहे.