Ticker

6/recent/ticker-posts

एकनाथजी शिंदे साहेब,मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य, मुंबई उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय कार्यालय, किनवट ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर निवास व भोजनासाठी एक रकमी रक्कम देण्यासंदर्भातली योजना तात्काळ कार्यान्वीत करणे.


मा. ना.एकनाथजी शिंदे साहेब,
मुख्यमंत्री ,
महाराष्ट्र राज्य, मुंबई

मार्फत :- उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय कार्यालय, किनवट 

विषय :- ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर निवास व भोजनासाठी एक रकमी 
         रक्कम देण्यासंदर्भातली योजना तात्काळ कार्यान्वीत करणे.

महोदय,
सप्रेम जय जिजाऊ॥
आपणास कळविताना अत्यंत खेद होत आहे की, नागपूर येथे झालेल्या मागील हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर निवास व भोजनासाठी एक रकमी रक्कम देण्यासंदर्भातली योजना जाहीर केली. मात्र अजूनही त्याचा शासकीय निर्णय आला नाही. ओबीसी समाजाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ही योजना अत्यंत महत्वाची आहे. सत्र 2023 -24 ला जून महिन्यापासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा शासन निर्णय लवकर निघाल्यास या सत्रापासून शिक्षण घेणाऱ्या गरीब ओबीसी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल व आपण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाप्रती संवेदनशील आहे हे देखील त्यातून सिद्ध होईल. अन्यथा ओबीसी विद्यार्थी आशेवरच वाट पाहत राहतील. कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही.
कृपया आपल्या सरकारने दिलेला शब्द पाळावा व तमाम गरीब ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.

    आपले विनीत.

 (सचिन कदम पाटील)
संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष किनवट 

आकाश इंगोले पाटील 
संभाजी ब्रिगेड ता. प्रसिद्धी प्रमुख 

रितेश मंत्री 
साई जाधव
संदेश भालेराव
निलेश कांबळे
विशाल शिंदे
चंद्रशेकर गरड
ईश्वर गुर्लेवाड