Ticker

6/recent/ticker-posts

सुलभ निवडणूक व मतदानाची टक्केवारी वाढण्यास बीएलओ यांनी मतदार यादी अद्यावत करावी-जिल्हाधिकारी अभिजीत राऊतकिनवट : आगामी निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घर ते घर सर्वेक्षण करून मतदार यादी अद्यावत करावी


सुलभ निवडणूक व मतदानाची टक्केवारी वाढण्यास बीएलओ यांनी मतदार यादी अद्यावत करावी
-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

किनवट : आगामी निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घर ते घर सर्वेक्षण करून मतदार यादी अद्यावत करावी. 

असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
    
 येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित "1 जानेवारी 2024

 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी विशेष पुनरिक्षण , शुद्धीकरण व मतदान केंद्र सुसूत्रीकरण कार्यक्रम कार्यशाळेत " मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
     
यावेळी 83-किनवट विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले, 

सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव (किनवट) व किशोर यादव (माहूर), नायब तहसिलदार विकास राठोड, मोहम्मद रफिक, अनिता कोलगणे मंचावर उपस्थित होते.
      
सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार (किनवट) डॉ. मृणाल जाधव यांनी प्रास्तविक व अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी विशेष कार्यक्रम पीपीटी प्रझेंटेशन केले.

 मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व बीएलओ ऍप वापराचे पॉवर पॉईंट प्रझेंटेशन द्वारे सविस्तर माहिती दिली. 

नायब तहसिलदार अनिता कोलगणे यांनी आभार मानले. या कार्यशाळेसाठी किनवट व माहूर तालुक्यातील सर्व बी.एल.ओ. , पर्यवेक्षक उपस्थित होते.
     

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री राऊत म्हणाले की, घर सर्वेक्षणात आढळून आलेल्या अनुपस्थित, स्थलांतरीत व मृत मतदारांची नावे रितसर प्रक्रिया पूर्ण करून राजकीय पक्षांच्या मतदान केंद्र सहायक यांच्या सहकार्याने वगळावे. 

अर्हता दिनांकावर 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदाराची नोंदणी करावी यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढेल. दिव्यांग व व्हीआयपी मतदारांची नावे चिन्हांकित करावी .
     
कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी गोविंद पांपटवार , मल्लिकार्जून स्वामी, नितीन शिंदे, वाय.एम. देवकते, वाय.बी. इनामदार, फारूख यांनी परिश्रम घेतले.