Ticker

6/recent/ticker-posts

*आमदार साहेब अधिवेशनातदिव्यांग.वृध्द,निराधारांच्या प्रश्नांसाठी लक्षवेधीने न्यायासाठि आपला आवाज निघेल काय? दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांचा सवाल


*आमदार साहेब अधिवेशनात
दिव्यांग.वृध्द,निराधारांच्या प्रश्नांसाठी लक्षवेधीने न्यायासाठि आपला आवाज निघेल काय? दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांचा सवाल*

नांदेड जिल्हा प्रतिनिधी चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर

  महाराष्ट्रात दिव्यांग वृध्द निराधार मतदार आपल्या हक्कासाठी अनेक आंदोलन करून शासन प्रशासनास जागे करण्याचा प्रयत्न करून लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे न्याय हक्क मिळत नाही.
        

  निवडणुकीत दिव्यांग वृध्द. निराधार गोरगरिबांचे आम्हीच कैवारी आहोत अशी वल्गना करुन मतासाठी दारोदार फिरून सत्तेत गेलेल्या आमदाराला कशी काय आठवण येत नाही.
   

   मतदार राजा जागा झाला लोकप्रतिनिधी सतेतसाठि चालत असलेला गोंधळामुळे आपणास जागा दाखविला जानार असल्यामुळे आता तरी शेवटच्या क्षणाला आमदार साहेबांनी जागे व्हावे व दिनदुबळे दिव्यांग,वृध्द निराधार एका महिन्यात दिड हजार रूपये मध्ये कसे जगतिल यांचा विचार करावा.
       

आपणास मतदार राजा सत्तेत पाठविल्यानंतर आपणास दरमहा एक लाख श्याऐंशी हजार दरमहा वेतन मिळते ते पण आपणास कमी पडत असेल तर दिनदुबळ्यांना दिड हजार म्हणजे दररोज पन्नास रुपये ते कसे जगतिल यांचा विचार 

आमदार साहेबांनी करावा चालु अधिवेशनात प्रश्न लक्षवेधी ने सभागृहात आवाज काढून न्याय द्यावा जर न्याय नाहि दिल्यास मतदार आपलि जागा दाखविल्याशिवाय राहानार नाहि अशी प्रसिद्धी दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली