आठवडी बाजारातील समस्या जाणून घेण्यासाठी भाजप नेते अशोक पाटील उतरले चिखलमय रस्त्यात
रस्ते,नाली,पिण्याचे पाणी,शौचालय,मोकाट जनावरे,लाइट व घनकचरा आधी मूलभूत प्रश्नाबद्दल जनतेत रोष
किनवट प्रतिनिधि
मागील काही वर्षापासून किनवटच्या आठवडी बाजाराचे बेहाल झाले असून नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मटन मार्केट,चिकन मार्केट,भाजी मार्केट,मच्छी मार्केटमध्ये चीखलांचे साम्राज्य पसरले आहे.कोणता ही नेता याकडे लक्ष देण्यास तय्यार नसल्यामुळे आठवडी बाजारची दयनीय अवस्था लक्षात घेऊन भाजपाचे नेते डॉ.अशोक पाटील सूर्यवंशी
यांनी दिनांक 22 जुलै रोजी मुसळधार पावसात तब्बल दोन तास बाजारपेठेत चिखलमय रस्त्यात पायी फिरून परिस्थितीचा जायजा घेतला व व्यापारी व नागरिकांच्या समस्या जाणून घेत सिमेंट रस्ते,पिण्याचे पाणी,वीज,शौचालय,मोकाट जनावरे व घनकचरा व्यवस्थापनाची कायमस्वरूपी सोय उपलब्ध करून देण्याची आश्वासन दिले आहे.
यावेळी आठवडी बाजारातील व्यापारी व नागरिकांनी नगरपालिका प्रशासन व तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या कारभाराविरोधात अशोक पाटील यांच्याकडे रोष व्यक्त केला.
मागील काळात भाजपा नेते डॉ.अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने किनवट नगर परिषदेवर एक हाती सत्ता प्रस्थापित केली होती.परंतु आठवडी बाजार येथील पायाभूत सुविधांच्या प्रश्न आज पर्यंत मार्गी लागला नाही.
रस्ते व नाल्या नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात मटन मार्केट,चिकन मार्केट, मच्छी मार्केट व भाजी मार्केटच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरते.महिला व नागरिकांना चिखल तुडवत बाजार करावा लागतो.
यावर्षीही मागील चार दिवसाच्या अतिमुसळधार पावसाने संपूर्ण बाजारपेठेत पाणी व दुर्गंधी साचल्याचे भीषण चित्र पहावयास मिळाले. दरम्यान बाजारपेठेची दयनीय अवस्था लक्षात घेऊन भाजपा नेते अशोक पाटील सूर्यवंशी
यांनी दिनांक 22 जुलै 2023 रोजी मुसळधार पाऊस सुरू असतानाही आपल्या कार्यकर्तासह तब्बल दोन तास बाजारपेठेत चिखलमय रस्त्यात पायी फिरून परिस्थितीची पाहणी केली व व्यापाऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.
यावेळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभार विरोधात अशोक पाटील यांच्याकडे रोष व्यक्त केला.
"साहेब आम्ही खूप अपेक्षेने सत्ता दिली होती" परंतु आमचा अपेक्षा भंग झाला.पाँच वर्षात ह्या लोकांनी किनवटचे काय हाल केले.
पाच वर्षात आम्हाला येथे रस्ते मिळाले नाही,पिण्यास पाणी मिळाले नाही,वीज मिळाली नाही,बाजारपेठेत २४ तास मोकाट जनावरांचा सुळसुळाट असतो.
चिखल व कचऱ्यामुळे वृद्ध नागरिक व महिलांना बाजारात चलने अत्यंत त्रासदायक ठरते.बाजारपेठेत ठीक ठिकाणी सर्रास मटका सुरू असतो
,तर अवैध देशी दारूची दुकाने भर बाजारपेठेत असल्याने मद्यपीकडून महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.जागोजागी कचरा असल्याने दिवसभर दुर्गंधीचा सामना करावा लागतो अशा अनेक समस्या दुकानदारांनी मांडल्या.
अशोक पाटील यांनी दुकानदार व जनतेची सर्व समस्या ऐकून घेतल्या व या संदर्भात नगर विकास मंत्रीकडे पाठपुरावा करून बाजारपेठेत सिमेंट रस्ते,नालिया, पिण्याचे पाणी,शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
शहरातील साफसफाई व घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरपालिका प्रशासनाला दर महिन्याला जवळपास १५ लाख रुपये प्राप्त होतात.