किनवट जिल्हा निर्मिती साठी शासनाची आगेकूच
किनवट (तालुका प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून किनवट जिल्ह्याची निर्मिती करावी अशा मागणीचे पत्र माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे यांनी महसूलमंत्र्यांना पाठविले होते त्याचे उत्तर दाखल शासनाच्या उपसचिवांनी राजेंद्र केशवे
यांना पत्र पाठवून अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून त्यामध्ये यावर सर्व बाबी तपासून निर्णय होईल असे कळविल्याने किनवट जिल्हा निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नांदेड जिल्ह्यापासून किनवट तालुका मोठ्या अंतरावर असल्याने आदिवासी बहुल परिसराचा विकास व्हावा या हेतूने किनवट करांनी किनवट जिल्हा व्हावा अशी मागणी अनेक वषार्पासून लावून धरलेली आहे यासाठी अनेक वेळा आंदोलने निवेदने झाले असून शासनही आहे.
किनवट जिल्हा निर्मितीसाठी अनुकूल असल्याची चर्चा होत असताना माहूर मधून अनेक मान्यवरांनी निवेदने दिलेली आहेत यापैकी प्राचार्य राजेंद्र केशवे
यांनी तत्कालीन मुख्यमंत्री महसूल मंत्री यांना २६ डीसेंबर २०२२ रोजी पत्र पाठवून किनवट जिल्हा निर्मिती करण्याची मागणी केली होती.
मागणीच्या अनुषंगाने महसूल व वन विभागाचे उपसचिव यांनी दिनांक १३ जुलै रोजी प्रा राजेंद्र केशवे यांना पत्र देऊन जिल्हा निर्मितीचे प्रस्ताव शासनाचा विचाराधीन असून सर्व संबंधितांच्या बैठकीत यावर निर्णय होऊन आपल्याला