Ticker

6/recent/ticker-posts

जलजीवन मिशनच्या निकृष्ट कामाची चौकशी करा, अन्यथा स्वातंत्र्य दिनी उपोषणलालूनाईकतांडावासियांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन किनवट तालुक्यातील मौजे लालू नाईक तांडा पळशी येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत


जलजीवन मिशनच्या निकृष्ट कामाची चौकशी करा, अन्यथा स्वातंत्र्य दिनी उपोषण

लालूनाईकतांडावासियांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन 

 किनवट तालुक्यातील मौजे लालू नाईक तांडा पळशी येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत च्या पाणीपुरवठ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत  असून एक  दोन फूट खोलीच्या नालीत अत्यंत हलक्या प्रतीचे पाईप टाकल्यामुळे काही दिवसातच पाईपलाईन फुटून योजना बंद पडण्याची शक्यता असल्यामुळे 

या कामाची त्वरित चौकशी करून कंत्राटदारासह संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करावेत व चौकशी होईपर्यंत कामाचे उर्वरित देखील अदा करण्यात येऊ नये 

अन्यथा 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा लालू नाईक तांडा येथील गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे.

 निवेदनात नमूद केले आहे की किनवट तालुक्यातील मौजे लालूनाईक  तांडा येथे सन 2023-2024 या वर्षी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याच्या कामासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला सदर काम जुलै अखेरीस पूर्ण करणे आवश्यक असताना कालावधी लोटल्यानंतर भर पावसाळ्यात गावातील मुख्य सिमेंट रस्ते फोडून गुत्तेदाराने नाली खोदल्यामुळे वहिवाट बंद झाली आहे.

पाईपलाईन टाकण्यासाठी एक ते दोन फूट नाली खोदून त्यात  अत्यंत हलक्या प्रतीचे पाईप थातूरमातूर पद्धतीने टाकण्यात आल्याने काही दिवसातच पाई फुटून पाणीपुरवठा बंद होण्याची भीती आहे

 या निकृष्ट कामासंदर्भात गुत्तेदार व संबंधित अभियंत्यांना गावकऱ्यांनी वारंवार तोंडी सांगण्याचा प्रयत्न केला असता गुत्तेदाराकडून उद्धट भाषेचा वापर केला जात आहे

 मी माझ्या पद्धतीनेच काम करणार तुम्हाला काय करायचे ते करा अशा शब्दात गावकऱ्यांची दमदाटी करून मनमानी पद्धतीने काम होत असल्यामुळे शासनाच्या निधी वाया जात आहे.

 लालूनाईक तांडा येथे दरवर्षीच उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असते. अशा टंचाईग्रस्त गावात जलजीवन मिशनचे लाखो रुपयांचे काम निकृष्ट दर्जाचे करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला जात असल्यामुळे 

या कामाची सखोल चौकशी करावी व गुत्तेदारासह संबंधित अभियंत्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा 15 ऑगस्ट 2023 या स्वातंत्र्यदिनी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.


 निवेदनावर लालू नाईकतांडा येथील पुरणसिंग राठोड, सामाजिक कार्यकर्ते अनिलभाऊ राठोड,भारत पवार, प्रकाश गेडाम,वामन चव्हाण, जनार्दन राठोड, गोवर्धन राठोड,दूलसिंग जाधव, यशवंत राठोड, किशन जाधव, प्रदीप चव्हाण, वामन आरके,, 

दिलीप चव्हाण,शिवाजी राठोड, निखिल परचाके, रमेश आडे, बळीराम चव्हाण, दिगंबर कनाके, विनायक राठोड यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत