Ticker

6/recent/ticker-posts

येणाऱ्या काळात फक्त जन मत्तावर आधारित भाजपा आपला उमेदवार निश्चित करणार*:- *अशोक पाटील सुर्यवंशी* किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट तालुक्यामधील भाजपा चे सर्व सर्वोत्कृष्ट नेते श्री अशोक पाटील सूर्यवंशी हे वर्तमान काळात जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत


येणाऱ्या काळात फक्त जन मत्तावर आधारित भाजपा आपला  उमेदवार निश्चित करणार*:- *अशोक पाटील सुर्यवंशी* 

किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट तालुक्यामधील भाजपा चे सर्व सर्वोत्कृष्ट नेते श्री अशोक पाटील सूर्यवंशी हे वर्तमान काळात जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत 2019 मध्ये जनसामान्यांनी श्री अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या शब्दावर वर्तमान आमदार निवड केलेली आहे परंतु वर्तमान आमदार हा भाजपा पुरस्कृत पक्षाचा असल्यानेही सारखणी ते आदिलाबाद 

या राज्य महामार्गावर फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे यासाठी आज दिनांक 13  /7/ 2023 रोजी श्री अशोक पाटील सूर्यवंशी यांनी भाजपा कार्यालय किनवट येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये गेल्या एका महिन्यापूर्वी राज्य महामार्ग चे दुरुस्ती  झाले 

आणि आज तो महामार्ग हा फार मोठ्या प्रमाणात त्याची दुरावस्था झाली असे अशोक पाटील सूर्यवंशी यांनी त्यांच्या मोबाईल टॅब मध्ये रेकॉर्डिंग असलेल्या व्हिडिओमध्ये सर्व पत्रकारांना तो व्हिडिओ दाखवला किनवट /माहूर विधानसभेमध्ये काही काळापूर्वी भाजपाला उतरती कळा आली होती. विकासाचे दृष्टिकोन असलेले

 श्री अशोक पाटील सूर्यवंशी यांनी 2019 पूर्वी किनवट/ माहूर तालुका पिंजून काढला आणि किनवट /माहूर तालुक्यामध्ये भाजपाला भरभराटीचे स्थान मिळवले 2019 मध्ये भाजपा पक्षाने भाजपा पुरस्कृत पक्षाचे वर्तमान आमदाराची उमेदवार म्हणून निवड केली आणि अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या शब्दामुळे वर्तमान आमदार जनसामान्याच्या मताने निवडून आले

 वर्तमान आमदाराने शासनाकडून भरगच्च निधी किनवट/ माहूर विधानसभेसाठी आणला परंतु त्या निधीतून विकासाचे कामकाज ज्याप्रमाणे होत आहे 

त्यावर नियंत्रण जणूकाही वर्तमान आमदाराचे नाही. म्हणूनच 2019 ते आज पर्यंत शासकीय कामांमध्ये भ्रष्टाचाराचे वातावरण किंबहुना सत्य परिस्थिती निर्मिती झालेली आहे 

या अनुषंगाने आमचे प्रतिनिधी विलास सुर्यवंशी यांनी श्री अशोक पाटील सूर्यवंशी यांना प्रश्न  विचारला की 2019 पासून ते आज पर्यंत तुमच्या शब्दावर निवडून दिलेल्या आमदाराने विधानसभेमध्ये या भ्रष्टाचारी कंत्राटदाराविरुद्ध किंबहुना भ्रष्टाचारी प्रशासकीय अधिकाऱ्याविरुद्ध आजवर काही प्रश्न विचारला का ?यावर उत्तर म्हणून 

श्री अशोक पाटील सूर्यवंशी यांनी पत्रकारांना आजवर प्रश्न या भ्रष्टाचारी कंत्राट दारावर किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यावर प्रश्न विधानसभेमध्ये 2019 पासून आज  पर्यंत विचारलेला नाही .परंतु फक्त विधान सभेच्या निवडणुकीला अंदाजे आठ दहा महिने राहिलेले आहे या काळामध्ये निश्चितच वर्तमान आमदाराला याविषयी प्रश्न विचारण्यास मी भाग पाडणार आहे 
अशी ग्वाही पत्रकारांना दिली मग 2019 मध्ये आप्पारावपेठ ,शिवनी पासून ते केरोळी शेकापुर  या गावापर्यंतच्या जनसामान्यांनी वर्तमान आमदारांना अशोक पाटील सुर्यवंशी यांच्या सांगण्यावरून निवडून दिले निवडून दिल्या नंतर शासनाने भरगच्च किनवट /माहूर विधानसभेला निधी दिला

 या निधीची योग्यरीत्या  विकासा साठी वापर होत आहे का नाही हे तपासण्याची जबाबदारी वर्तमान आमदाराची आहे किंवा नाही.तसेच किनवट/ माहूर मधल्या जनसामान्यांना शब्द दिलेल्या  अशोक पाटील सूर्यवंशी 

यांची त्या निधीवर अथवा त्या विकासावर किंबहुना निवडून आलेल्या वर्तमान आमदाराच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी होती का नव्हती? हा प्रश्न जनसामान्य विचारत आहेत. जर अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या शब्दावर वर्तमान आमदार निवडून येत असेल तर 

अशोक पाटील सूर्यवंशी वर्तमान भ्रष्टाचाराच्या परिस्थितीला जबाबदार का नसावे असा प्रश्नही जनसामान्य विचारत आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये जनसामान्याला भेटी देणे किंबहुना एखाद्या महामार्गाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे 

तसं प्रदर्शन पत्रकाराच्या पत्रकार परिषदेमध्ये करणे हे वर्तमान आमदाराच्या भ्रष्टाचारी परिस्थिती नियंत्रणात आणणे हे वर्तमान आमदाराच्या कार्य कक्षेत नाही काय? किंबहुना वर्तमान आमदार प्रशासकीय कंत्राट दाराची कार्यपद्धती यावर नियंत्रण ठेवू शकत नाही काय? किंबहुना जलसामान्याला शब्द देणारे अशोक पाटील सूर्यवंशी 

यांचेही ते कर्तव्य नाही काय? कारण की ते आज रोजी महाराष्ट्र भाजपा कार्यकारणी सदस्य आहेत त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. रोडच्या कामात भ्रष्टाचाराचे प्रदर्शन करून ते जनसामान्याला काय सांगत आहेत खरंच

 त्यांच्या शब्दावर वर्तमान आमदार जनसामान्य निवडून दिलले जर तो नेता भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवू शकत नसेल तर अशोक पाटील सूर्यवंशी तसेच भाजपा पक्षासाठी ही लाजिरवाणी बाब नाही काय? किंवा अशोक पाटील सूर्यवंशी

 यांनी जनसामान्यांना  2019 मध्ये वर्तमान आमदाराला जनसामान्यांनी निवडून द्यावे असे म्हणून फसवले काय? अशी परिस्थिती असा प्रश्न जनसामान्य आज रोजी विचारत आहेत. त्यांचेही कर्तव्य या भ्रष्टाचारी व्यक्तिमत्त्वाला अथवा परिस्थितीला नियंत्रणात आणण्याचे नाही काय? 

असे जनसामान्यातून बोलल्या जात आहे तर येणारा काळ हा भ्रष्टाचार विरहित किनवट/ माहूर विधानसभा करणारा उमेदवार भारतीय जनता पार्टीने द्यावा ही अपेक्षा जनसामान्यातून करण्यात येत आहे फक्त जनमत हे विकासाचे साधन होऊ शकते असे अशोक पाटील सुर्यवंशी यांनी सांगितले किंबहुना 

त्या जन मताचा वापर किनवट/ माहूरच्या विकासासाठी होऊ शकतो किंवा कसे यावरही वर्तमान भाजपा पक्षाने किंवा सरकारने विचार करायला हवा किनवट /माहूर येथील जनसामान्य लोकांचा  निश्चितच भाजपा सरकारच्या पाठिंबा आहे

 परंतु भाजपा सरकारने दिलेला निधी या निधीचा उपयोग योग्य प्रकारे होतो का नाही याची  जबाबदारी हे वर्तमान आमदार तथा किनवट /माहूर विधानसभेचे नेते अशोक पाटील सूर्यवंशी यांच्यावरच जाते हे मात्र निश्चित आहे. 

या पत्रकार परिषदेला विविध  वरिष्ठ पत्रकार तसेच अनेक कार्यकर्ते हे हजर होते.