Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटना,कीनवट च्या वतीने मा.श्री.बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस दिव्यांग विध्यार्थ्यासोबत साजरा


प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटना,कीनवट च्या वतीने मा.श्री.बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस दिव्यांग विध्यार्थ्यासोबत साजरा.

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी राज्यमंत्री मा.श्री बच्चुभाऊ कडु यांचा वाढदिवस  निवासी मुकबधीर विध्यालय कीनवट येथे कीनवट ,गोकुंदा

 येथील मुकबधीर विद्यालय,मतीमंद विद्यालय  ,अस्तीव्यंग विद्यार्थ्यांना व दिव्यांग लोकांना पोटभर पुलाव व जीलेबीचे जेवन देऊन साजरा करण्यात आला.तसेच संथागार वृद्धाश्रमातील वृद्धानाही पोटभर पुलाव जिलेबीचे जेवन देण्यात आले.

त्यावेळी संथागार व्ृद्धाश्रमाचे संस्थापक मा.अरुण दादा आळणे यानी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री मधुकर शेंडे यांचा बच्चुभाऊंचे छायाचित्र असलेली घड्याळ भेट देऊन सत्कार केला. 

त्या बरोबरच काही दिव्यांग लोकांना UDID कार्डाचे वाटपही प्रहारचे तालुका अध्यक्ष मधुकर शेंडे व दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष भगवान मारपवार यांचे हस्ते करण्यात आले.

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवासी मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गंगाखेडकर सर ,धुर्वे सर व त्यांचे सहकारी यानी सहकार्य केले . तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी व प्रहार दीव्यांग संघटनेचे शेख फीरोज ,अब्दुल सलीम ,बाळु आडे 

व सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले .प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर रामराव शेंडे यांनी सर्वांचे आभार मानले.