Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहरातील नगर परिषद (जुनी) समोरील संविधान स्तंभ मोडकळीस व जीर्ण झाल्याने मूळ जागीच स्तंभाचे नुतनीकरण करणे बाबत



मा.सहाय्यक जिल्हाधिकारी साहेब,
उपविभागीय कार्यालय,किनवट जि.नांदेड

विषय : किनवट शहरातील नगर परिषद (जुनी) समोरील संविधान स्तंभ मोडकळीस व जीर्ण झाल्याने मूळ जागीच स्तंभाचे नुतनीकरण करणे बाबत.

उपरोक्त विषयी सविनय अर्ज सादर करण्यात येतो की,किनवट शहरातील नगर परिषद (जुनी) समोरील संविधान स्तंभाचे बांधकाम हे फार जुने असून सद्यस्थितीत संविधान स्तंभ मोडकळीस आल्यामुळे स्तंभाचे नूतनीकरण व सुशोभिकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.

संविधान स्तंभ शहराच्या मध्यभागी असून स्तंभाच्या सभोवती अतिक्रमण झाल्यामुळे स्तंभा भोवती घाण होत असून सदरील प्रकार हा समस्त संविधान प्रेमी जनतेच्या भावना दुखावण्याचा व माणहाणीचा आहे.


तरी, मे.साहेबांना विनंती की, संविधान स्तंभाच्या नूतनीकरनाचे गांभिर्य लक्षात घेऊन त्वरित नूतनीकरण करण्याचे काम मूळ जागीच करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. ही नम्र 

विनंती ।
 राजेंद्र विट्ठलराव शेलके
अजमल शेख सलाओद्दीन
निखील वाघमारे
सिद्धार्थ शिवाजी वाघमारे 
दत्ता एम भालेराव
संदीप निखाते 
प्रवीण पाटील
राहुल किशनराव चौदंते 
बापुराव सावते