Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येते पार पडला महावितरण अभियंता व कर्मचाऱ्यांचे निरोप समारंभ -महावितरण मधील काही अभियंता व कर्मचाऱ्यांचे बदली झाल्याने किनवट येथे निरोप समारंभ पार पडला.


किनवट येते पार पडला महावितरण अभियंता व कर्मचाऱ्यांचे निरोप समारंभ

प्रतिनिधी -
महावितरण मधील काही अभियंता व कर्मचाऱ्यांचे बदली झाल्याने किनवट येथे निरोप समारंभ पार पडला.

सविस्तर वृत्त असे की, तारिक १६ जुलै रविवारी रोजी कलावती गार्डन किनवट 

येथे महावितरण क्षेत्रातील सहाय्यक अभियंता महेश भांगे ( किनवट शहर कक्ष ), 
सुरेश गट्टूवार कनिष्ठ अभियंता 

( बोधडी कक्ष ) व काही कर्मचाऱ्यांचे विनंती बदली इच्छुक ठिकाणी झाल्याने  निरोप समारंभ कार्यक्रम उपविभागीय कार्यालय किनवट तर्फे  आयोजित करण्यात आले होते.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणून माहुरचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता श्री सुमित दडमल साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्रीकांत जाधव साहेब मांडवी, श्री दिलीप राठोड साहेब, श्री वोलेवार साहेब, श्री यशवंत कांबळे साहेब, श्री  राजू मोहरे साहेब आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी किनवट शहर कक्ष,ग्रामीण कक्ष १,ग्रामीण कक्ष २, बोधडी कक्ष, सारखनी कक्ष, मांडवी कक्षातील सर्व अधिकारी, कर्मचारी व यंत्रचालक यावेळी मान्यवरांच्या व बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार यांनी केले तर टारपे साहेब यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.