Ticker

6/recent/ticker-posts

kinwat तालुका पावसात अनेकांच्या घरांची पडझडं होऊन गोरगरिबांचे संसार उघड्यावर आलें आहेत तर शेतकऱ्यांची जनावरे मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यावर ओढवलेली ही नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन माजी आ प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्ठामंडळाने तालुकाध्यक्ष बालाजी बामणे यांच्या नेतृत्वाखाली दि 24 जुलै रोजी तहसीलदार मृणाल जाधव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले


किनवट 
 दि 20 ते 23 जुलै दरम्यान किनवट तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर शेतीक्षेत्राचे  अतोनात नुकसान झाले आहे. 

पिकासह  जमिनी पूर्णतः खरडून गेल्याने या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयाची तातडीची आर्थिक मदत द्यावी अशा मागणीचे निवेदन मा आ प्रदीप नाईक यांच्यानेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्ठामंडळाने तहसीलदार  मृणाल जाधव यांना दिले आहे.

दि 20 ते 23 जुलै या दरम्यान किनवट तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून नदी नाल्याना आलेल्या पुरामुळे पिकासह शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. कापूस तूर सोयाबीन मूग उडीद ज्वारी इत्यादी पिके पाण्याखाली आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

  पावसात  अनेकांच्या घरांची पडझडं होऊन गोरगरिबांचे संसार उघड्यावर आलें आहेत तर  शेतकऱ्यांची जनावरे मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यावर ओढवलेली  ही नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन माजी आ प्रदीप नाईक 

यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्ठामंडळाने तालुकाध्यक्ष बालाजी बामणे यांच्या नेतृत्वाखाली दि 24 जुलै रोजी तहसीलदार मृणाल जाधव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. 

शासनाने कोणतेही निकष न लावता नुकसानग्रस्त शेतीक्षेत्राचे त्वरित पंचनामे  करून  शेतकऱ्यांना सरसकट एकरी 50 हजार रु तातडीची आर्थिक मदत द्यावी तसेच खरडून गेलेल्या शेतजमिनी मग्रारोहयोतुन दुरुस्त करून देण्याची मागणी निवेदनात केली आहे.यावेळी शिष्ठमंडळाने पडझडं झालेली घरे, 

मृत्यूमुखी पडलेली जनावरे व मार्च 2023 मधील गारपिटीच्या प्रलंबित अनुदानावर  तहसीलदाराशी चर्चा केली असून लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आद्ययावत नसल्याने अनेक शेतकरी गारपिटीच्या अनुदानापासून वंचित असल्याची बाब

 त्यांच्या निदर्शनास आणून देत अशा वंचित शेतकऱ्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणीही शिष्ठामंडळाने केली आहे.
या शिष्ठामंडळात राकॉ आदिवासी सेलचे विभाग समन्वयक जयवंत वानोळे, विधानसभा अध्यक्ष राहुल नाईक,

 ता उपाध्यक्ष बाळू पाटील पवार, जिल्हा कार्याध्यक्ष बंटी पाटील जोमदे, जिल्हा सरचिटणीस पांडुरंग राठोड, श्रीकांत बोईनवाड, 

गजानन सोळंखे, रोहिदास जाधव, कचरू जोशी, दत्ता पवणे, मधुकर गवले, बाळू शेरे, सरपंच भुरके, प्रमोद मुनेश्वर, प्रमोद कोसरे, अमोल जाधव, मनोहर श्रीरामे, सरपंच गोविंद धुर्वे, गजानन टेलके, उपसरपंच राजु सुरोशे, 

साई तिरमनवार, रामदास राठोड, संतोष मिरासे, रविंद्र चव्हान, पृथ्वीराज आडे, उपसरपंच महेश कनकावर, भगवान बामन आदींचा समावेश होता.