कर्जाच्या चिंतेने व मागिल अतिवृष्टी मुळें शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने
विषारी औषध प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या
मदनापुर (चि) येथील एका शेतकऱ्यांने कर्जाच्या चिंतेने व मागिल अतिवृष्टी मुळें शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने विषारी औषध प्राशन केल्याची घटना ०८ आगॅस्ट दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली
गणेश रामु राठोड ( ५० ) असे मयताचे नाव आहे.
त्यानें विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांस गोकुंदा येथील शासकीय रुग्णालयांत प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी आदिलाबाद व आदिलाबाद हून यवतमाळ येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यवतमाळ येथील रूग्णालयात उपचार सुरू असताना १२ आगॅस्ट रात्री १० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला
सततच्या नापिकीमुळे कर्ज बाजारी झाले होते.
त्यात या वर्षी तरी चांगले पिक उत्पादन होईल या आशेने शेतीत जोमाने कामाला सुरुवात केली होती.
पण सतत अतीवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याची चिंता त्यांना सतावत होती.
महागाईच्या काळात मुलांचे शिक्षण व संसाराचा गाडा चालवणे कठीण जात होते.
शासनाच्या योजना शेतकऱ्यांच्या दारी पोहोचतच नाही व मालाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचा जाणकारांचे मत आहे.