मांजरीमाथा या आदिवासी गावचा त्रास काही संपेना
किनवट:-जलधरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मांजरीमाथा या आदिवासी बहुल गावात अजुन पक्का रस्ता नाही ही नांदेड जिल्ह्यासाठी खुप लाजीरवाणी बाब आहे
कारण एकीकडे आपण स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करत आहोत तर एकीकडे
या गावी अजुन पक्का रस्ता उपलब्ध नाही परवाच एका आजारी वयोवृद्ध महिलेस साडीची झोळी करून दवाखाण्यात उपचार घेण्यासाठी जावे लागले
अशे किती तरी महिला प्रसुती करीता जाण्यासाठी व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हि समस्या उदभवत असेल याची कल्पना न केलेलीच बरी मागेच २०२२ मध्ये तेथील ग्रामस्थानी रस्त्याची मागणी केली परंतु फॉरेस्ट विभाग व लोक प्रतिनिधी यांच्या पेच मध्ये
तेथील ग्रामस्थाची दशा सुरु आहे आणि तेथील ग्रामस्थ आत्मदहनाच्या तयारीत आहेत कारण त्यांच्याकडे आता पर्यायच राहिला नाही अशी माहिती तेथील स्थानिक ग्रामस्थांनी संपर्क साधुन कळवली आहे