चर्चेतली माणसं
विलासपूरचे जिल्हाधिकारी डॉ.संजय अलंग हे विलासपुर येथील मध्यवर्ती कारागृहात तपासणीसाठी पोहोचले असता त्यांना एक ६ वर्षांची मुलगी वडिलाना मिठी मारून रडताना दिसली चौकशी केल्यावर कळले की तो इसम एका गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेला कैदी आहे
आणि ही त्याची मुलगी आहे. त्याने ५ वर्षे शिक्षा भोगली आहे, आणखी ५ वर्षाची शिक्षा बाकी आहे
ही मुलगी १५ दिवसाची असताना तिच्या आईचे निधन झाले.
तिची काळजी घेण्यासाठी घरी कोणी नव्हते. त्यामुळे तिला वडिलांसोबत तुरुंगात राहावे लागते
हे ऐकुन जिल्हाधिकारी डाॅ .संजय अलंग यांना वाईट वाटले व त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन त्या मुलीला आपल्या गाडीत बसवले आणि तिला विलासपुरमधील जैन इंटरनॅशनल स्कुल या शाळेत तिला Sr. K.G. मध्ये अॅडमिशन घेऊन दिले
ते फक्त एवढ्यावरचं थांबले नाही तर तिच्या राहण्याची व्यवस्था शाळेच्या वसतिगृहात केली आणि तिची काळजी घेण्यासाठी विशेष केअर टेकरची व्यवस्था केली
, मुलीच्या संपुर्ण शिक्षणाचा , वस्तीगृहाचा , केअर टेकरचा आणि तिच्या सर्व गरजा पुर्ण करण्याचा खर्च जिल्हाधिकारी स्वताः उचलणार आहेत ....