Ticker

6/recent/ticker-posts

शिव-शक्ती परिक्रमा - पंकजाताई मुंडे यांनी घेतले श्रीक्षेत्र माहूरच्या रेणुकादेवीचे दर्शन.कार्यकर्त्यांकडून ठिक ठिकाणी जंगी स्वागत ; 'कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघिण आली' घोषणेनं परिसर दुमदुमला !सर्व सामान्य जनता, शेतकऱ्यांच्या सुखासाठी केली प्रार्थना


शिव-शक्ती परिक्रमा - पंकजाताई मुंडे यांनी घेतले श्रीक्षेत्र माहूरच्या रेणुकादेवीचे दर्शन.

कार्यकर्त्यांकडून ठिक ठिकाणी जंगी स्वागत ; 'कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघिण आली' घोषणेनं परिसर दुमदुमला !

सर्व सामान्य जनता,  शेतकऱ्यांच्या सुखासाठी केली प्रार्थना

नांदेड । दिनांक ३० - शिव-शक्ती दर्शन परिक्रमेतंर्गत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावर जाऊन रेणुकामातेचे दर्शन घेतले. राज्यातील सर्व सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या सुखासाठी त्यांनी प्रार्थना केली. 

युवा नेते बालाजी(बंटी)फड यांच्या वतीनं यावेळी त्यांचं जंगी स्वागत स्वागत करण्यात आलं.

   महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी शिव-शक्ती दर्शन परिक्रमा करण्याची घोषणा केली आहे. 

या अंतर्गत त्यांनी आज सकाळी श्रीक्षेत्र माहूर गडावर जाऊन रेणुकामातेची विधिवत पूजा अर्चना करून दर्शन घेतले.

*कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत : 'कोण आली रे कोण आली' घोषणा गरजली

माहूरला जाण्यासाठी पंकजाताई मुंडे यांचे सकाळी खासगी विमानाने नांदेड विमानतळावर आगमन झाले. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे देखील

 यावेळी त्यांच्यासमवेत होते.असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. माहूरकडे जाताना रस्त्यात  अर्धापूर, वारंगा फाटा, हदगांव आदी ठिक ठिकाणी त्यांच्या वाहनांचा ताफा थांबवून  कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.

 'कोण आली रे आली, महाराष्ट्राची वाघिण आली' या घोषणेनं परिसर दणाणून गेला होता. दरम्यान,  माहूर शहरातही  बालाजी(बंटी)फड. आणि भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केल.