Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वे स्थानकाचं आधुनिकीकरण हे प्रधानमंत्री यांच्या दुरदर्शी दृष्टीकोणाचं फलित-आमदार भीमराव केरामकिनवट : रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी शेवटचं टोक असलेल्या सीमावर्ती भागातील किनवट स्थानकाचा "अमृत भारत स्टेशन योजना


रेल्वे स्थानकाचं आधुनिकीकरण हे प्रधानमंत्री यांच्या दुरदर्शी दृष्टीकोणाचं  फलित
-आमदार भीमराव केराम

किनवट : रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी शेवटचं टोक असलेल्या सीमावर्ती भागातील किनवट स्थानकाचा "अमृत भारत स्टेशन योजना

" मधील देशातील 508 स्थानकात समावेश केल्याने सततच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन स्थानकाचा कायमस्वरूपी कायापालट होणार आहे. 

त्यामुळे या भागातील प्रवासी, यात्रेकरू व व्यापारी यांना मोठा लाभ होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दुरदर्शी दृष्टीकोणाचं हे फलित आहे. असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.
        
येथील रेल्वेस्थानकात रेल्वे स्थानक पुनर्विकास पायाभरणी समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे किनवट रेल्वे स्थानकाचा 

"अमृत भारत स्टेशन योजना" मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी समावेश केला आहे. प्रवाश्यांना आरामदायी सुविधा देण्यासाठी होणारं रेल्व स्थानकाचं आधुनिकीकरण हे एक मोठं परिवर्तन आहे. 

यामध्ये दर्शनी भागाचे सौंदर्यीकरण, रुंद, प्रशस्त व सुशोभीत सुखकारक प्रवेशद्वार , सुधारित प्रकाश व्यवस्था, स्थानिक कारागिरांना प्रोत्साहनासाठी 'एक स्टेशन एक उत्पाद' , रेल्वे गाड्यांची नावे व महत्वाची माहिती प्रदर्शित करण्यासाठी सुंदर डिझाईनचे होर्डिंग, 

भव्य कव्हर शेड, नविनतम प्रतीक्षालय, शौचालय, लिफ्ट , एस्केलेटर, वृद्ध व दिव्यांग बांधवांना पुरेशा सुविधा आदी सर्व बाबी दर्जेदार होणार आहेत. रेल्वे प्रवासाच्या मानकांमध्ये ही एका नव्या युगाची साक्ष आहे.
       

प्रमुख अतिथी नगर परिषदेचा प्रशासक तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यावेळी म्हणाल्या की, शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या उपक्रमामुळे शक्तीपीठ असलेल्या या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. देशाच्या वाढत्या आकांक्षाशी जुळण्यास ही सर्वोत्तम सुविधा प्राप्त होणार आहे.
          
विभागीय यांत्रिकी अभियंता परममित्र यांनी प्रास्ताविक व उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. 

नांदेडचे सिनिअर डीएमएम श्यामलाल दसमाना यांनी आभार मानले. दीपप्रज्वलन व वंदन गीतानंतर भारत हातमोडे, राधिका तिरमनवार, वंदना सदावर्ते, प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे, प्रा. सुहास कुलकर्णी, 

प्रा. डॉ. राजकुमार राठोड, प्रा. अपर्णा आरमाळकर व अंतरा बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरस्वती विद्या मंदीर माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी संत तुकडोजी महाराज यांची प्रार्थना, देशभक्तीपर व आदिवासी नृत्य सादर केले. 

"देश और रेलवे मे क्या अच्छा हो रहा है " या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध , वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेतील यशवंतांना मान्यवरांच्या हस्ते परितोषिके देण्यात आली. 

स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी योगदान देणारे मुख्याध्यापक तथा संस्था सचिव कृष्णकुमार नेम्माणीवार, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे व मनिषा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
       

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कळ दाबून देशातील 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास पायाभरणीचा शुभारंभ केला व व्हिडिओ कान्फरसिंगद्वारे संबोधित केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पायभरणी फलकाचे अनावरण करण्यात आले.
          
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रेल्वेच्या सामजिक कल्याण विभागाचे रामबाबू, मुख्य वाणिज्य निरीक्षक मनोजकुमार, मुख्य तिकीट निरीक्षक प्रमोद निकाळजे, दिलीप देठे, स्टेशन मास्तर मीना आदींसह रेल्वेचे सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
          
कार्यक्रमास रिपाईंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, भाजपा उत्तर जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, पीरिपचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, 
माजी नगराध्यक्ष के. मूर्ती , साजीदखान, 

भाजपचे धरमसिंग राठोड, राघूमामा, माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्माणीवार, 

शिवसेना तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे पाटील , भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, सुरज सातुरवार, अजय नेम्माणीवार, 

रिपाईंचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार, शेतकरी संघटनेचे त्रिभूवणसिंग ठाकूर , मनोज तिरमनवार आदी मान्यवरांसह पत्रकार, नागरिक, विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते.