Ticker

6/recent/ticker-posts

चिपळूण, रत्नागिरी येथील घटनेचा किनवट येथील नाभिक समाजाकडून जाहीर निषेध..घटनेतील दोषी आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या अशी तहसीलदारा मार्फत गृहमंत्र्याकडे मागणी


चिपळूण, रत्नागिरी येथील घटनेचा किनवट  येथील नाभिक समाजाकडून जाहीर निषेध..

घटनेतील दोषी आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या अशी तहसीलदारा मार्फत गृहमंत्र्याकडे मागणी...

किनवट  प्रतिनिधी /-आज दिनांक सात ऑगस्ट रोजी  रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील नाभिक समाजाची कु. नीलिमा सुधाकर चव्हाण

 या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याच्या घटनेवरून किनवट  महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आज घटनेचा जाहीर निषेध करून 

किनवट  येथील  तहसीलदारा मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक लेखी निवेदन देऊन घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून

 त्यांना फाशीची शिक्षा द्या अन्यथा सर्व नाभिक समाज रस्त्यावर उतरून जनाक्रोश आंदोलन करेल अशी मागणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.