किनवट'!प्रतिनिधी) राहत्या घरात पत्नीची हत्याकरून पत्तीने नायलोन दोरीने राहत्या घरातच गळफास घेतल्याची धक्कादायक घटना दिनांक 20 सप्टेबर 2023 रोजी सकाळी साडे आठ वाजल्या सुमारास उघडकीस आल्याने या दुहेरी घटनेने चांगलीच खळबळ उडाली असून ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी बहुल भागातील भिसी या ठिकाणी घडली.
या घटनेची माहिती इस्लापूर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उमेश भोसले यांना मिळताच उमेश भोसले यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता 29 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह लाकडी पलंगावर आढळला तर पतीचा मृतदेह नायलोन दोरीने गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेत आढळला.
विवाहित महिलेची हत्या झालेल्या महिलेचे नाव रूपाली मारुती भालेराव व 29 वर्ष राहणार भिशी तर
नायलोन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव मारोती विठ्ठल भालेराव वय 35 वर्ष राहणार भिसी असे असल्याचे इस्लापूर पोलिसाकडून कळाले. मयत मुलीचे वडील अशोक माधव जोगदंड व 43 वर्षे राहणार मुखेड
यांनी दिलेल्या तक्रारीवरून इस्लापूर पोलिसात भा.द.वी 302 , 34 कलमानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यातील आरोपी यांचेकडून मुलीस मूलबाळ होत नाही या कारणावरून सतत मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत असल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले.
यावरून यातील मुलीची सासू अनुसयाबाई विठ्ठल भालेराव वय 53 वर्ष, दिर दत्ता विठ्ठल भालेराव वय 32 वर्ष ,ननंद सुहासिनी विठ्ठल भालेराव 27 वर्ष यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मलघणे यांनी भेट दिली
सा. पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक टोपाजी एकनाथ कोरके हे तपास करीत आहेत.हे सदरील मृत देहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी खूपसे व वैद्यकीय अधिकारी शिंदे यांनी केले.