Ticker

6/recent/ticker-posts

21 व्या शतकाच्या 3 ऱ्या दशकातील "पेशवे" आदरणीय देवेंद्र फडवीस साहेब... नांदेड वाले नाही, पंत...मी किनवट बोलतेय !* आदरणीय पंत देवेंद्र साहेब, नमस्कार. मी किनवट बोलतेय.ज्याच्या सोबत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आदरणीय त्वरित निर्णय शक्तीचे महामेरू अजित दादा तुमच्या सोबत आहेत


21 व्या शतकाच्या 3 ऱ्या दशकातील "पेशवे" आदरणीय देवेंद्र फडवीस  साहेब... नांदेड वाले नाही,  पंत...
मी किनवट बोलतेय !* 

आदरणीय पंत देवेंद्र साहेब, नमस्कार. मी किनवट बोलतेय.

ज्याच्या सोबत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आदरणीय त्वरित निर्णय शक्तीचे महामेरू अजित दादा तुमच्या सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन किंबहुना पंत त्यांच्या नावाने तुम्ही मराठेशाही अर्थात महाराष्ट्र चालवत आहात. म्हणूनच तुम्हाला 21 व्या शतकातील 3 रया दशकातील " पेशवा" म्हणावा लागेल हे दशक संपण्या अगोदर तुम्ही "दिल्ली" काबीज करसाल यात तिळमात्र शंका नाही.

आदरणीय पंत तुमचे आणि माझे म्हणजे (किनवट) चे वेगळे नाते म्हणजे एरव्ही आपण मला कागदावरच जाननारे तुम्ही तुमचा आणि माझा संबंध प्रतेक्ष 2019 साली आला ती तुमची अद्वितीय बुद्धिमत्ता व काम करण्याची पद्धत यामुळेच मला माझ्या मनचक्कशू मध्ये माझा प्रशासकीय, औद्योगिक, शैक्षणिक,संस्कृतीक,आर्थिक विकास करून घेण्याच्या आशा पल्लवित झाल्या. आणि तुमच्या सोबत माझे कृष्ण - सुदामा सारखे संबंध निर्माण झाले. जे जगजाहीर आहेत. आणि आज माझ नाव देखील कोठे जगात निघाले की तुमचे नाव लगेच माझ्या सोबत भविष्यात जोडावे अशी माझी आत्मिक भावना आहे.माझे क्लेश माझ्या व्यथा तुम्ही एकच वेळ भेट दिली तुम्हाला ते कळल्या हे माझे भाग्यच म्हणावं लागेल एरव्ही मला ओळख न्याचे सामर्थ्य कुणीही दाखवले नाही जे तुम्ही दाखवले त्यामुळे माझी व्यथा तुम्हाला कळणे  क्रमप्राप्त आहे. कारण दुसऱ्याला कळणार देखील नाही आणि कळाली तरी जशी तुम्हाला  कळेल तशी जमणार नाही. पंत मी स्वातंत्र्या पासून आजपर्यंत मला जिल्हा नावाचं कुंकू कधी लागते याची वाट पाहत आहे त्या सौभाग्याच्या कुंकवा मुळ माझा विकास होणार आहे असे मला वाटते. आदरणीय पंत तुमच्या शब्दामुळेच आम्ही भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार निवडून दिला किंबहुना तुमच्या मुळेच आम्ही लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत खासदार सुद्धा पाठवलेला आहे साहेब तुम्ही सभा घेतली त्यावेळेस व्यासपीठावरून आमचा सर्वांगीण विकास करतो असे तुम्ही आम्हाला आश्वासन दिले होते. साहेब माझ्या तालुका क्षेत्राच्या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विकासाचा अनुशेष बाकी आहे साहेब माझ्या परिसरातील शेतकऱ्याच्या जल सिंचनाच्या व्यथा ज्या तुम्ही सांगितल्या आणि त्या व्यथा तुम्ही माझ्या परिसराला बंधारे देऊन दूर करण्याचा प्रयत्न केला साहेब खरोखरच सांगतो फार बरं वाटलं आदरणीय पंत तुम्ही आमचे विकास उद्घारक आहात हे मला दिसत आहेत परंतु पंत माझ्या परिसरातील किंबहुना माझा औद्योगिक विकास सुद्धा अजून खूप बाकी आहे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत माझी एमआयडीसी एखाद्या मोठ्या प्रकल्पाची वाट पाहत आहे ,तसेच आदरणीय पंत माझा  महसूल विभाग येथे जिल्हाधिकारी पदाची वाट पाहत आहे, 
तसेच इथं जिल्हा सत्र न्यायाधीश यावे ही सुद्धा मी अतोनात वाट पाहत आहे, साहेब इथे शैक्षणिक विकास व्हावा याची सुद्धा मी वाट पाहत आहे, पंत इथे सांस्कृतिक विकास व्हावा आदिवासी बहुल, बंजारा समाजाची पवित्र संस्कृती अत्यंत महत्त्वाची आहे

 या संस्कृतीचे दर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ साहेब तुम्हीच मिळवून देऊ शकता पंत तुमच्यातील ती सामाजिक "समरसता"  व "परोपकारी" भावना माझा विकास करेल आदरणीय पंत तुम्ही आदरणीय भीमराव जी केराम यांच्या माध्यमातून माझा विकास करण्याचा प्रयत्न केला तसेच आदरणीय आनंदराव मच्छेवार यांनी सुद्धा माझ्या विकासात मोलाचा वाटा घेतलेला आहे, 
साहेब माझे परिसरातील रस्ते माझ्या परिसरातील पिण्याची पाणी, माझ्या परिसरातील होणारे शासकीय बांधकाम, 

ते "प्रशासकीय" काळात का होईना ते मात्र होत आहे. खूप बरं वाटलं साहेब तसेच माझ्या परिसरात तुम्ही नेहमी आय ए एस हे पद देत आहात म्हणून बरं वाटत आहे, 

परंतु हेही माझे ऐका साहेब अधिकारी हे सकारात्मक दर्जाचे मला द्या नाही तर माझ्या परिसरातील जनता व्यथित होईल ती व्यथा त्यांच्या भावना ह्या तुमच्या प्रति अयोग्य भावना निर्माण होईल आणि ते मला चांगलं वाटनार नाही कारण तुम्हीच माझे विकास करते आहात असे मला वाटते. पंत आदरणीय उत्तमराव राठोड यांच्यानंतर मला एकही मोठे सरकारी कार्यालय मिळाले नाही, पंत माझा प्रशासकीय विकास व्हावा अशी माझी मनोमनी अपेक्षा आहे, पंत माझा रेल्वे प्रश्न तर फार मोठा आहे , माझ्या परिसरातील नागरिकांना 

नांदेड येथे जाण्यासाठी बोटावर मोजण्या एवढ्या रेल्वे  आहेत, माझ्या परिसरातील नागरिकांनी हा प्रश्न विचारला तर आदिलाबादच्या पिट लाईन चा प्रश्न करून  माझ्याकडे माझ्या रेल्वेच्या प्रश्नाकडे जाणून-बुजून टाळल्या जाते पण तुम्ही ती व्यवस्था करू शकता हे मात्र निश्चित. आदीलाबादचे पिट लाईन तर त्वरितच व्हावीच परंतु पंत माझ्या कडे मुबलक जागा आहे

 त्या रेल्वे मालकीच्या जागेत सुद्धा ती पिट लाईन उभारता येऊ शकते.  मी तुम्हाला म्हणून पूर्ण पने सहाय्य करेल तुम्ही माझा विकास करा मी माझ्यासोबत पंत तुमचे नाव नेहमी जोडल्या जाईल याची मी आत्मिक भावनेने ग्वाही देतो हे मात्र निश्चित.

 आदरणीय पंत आपल्या सरकारकडून माझ्या परिसरातील नागरिकांच्या विकासासाठी कोट्यावधी रुपये अनुदान येते ते अनुदान त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लागत आहे का याच्याकडेही लक्ष द्या  कारण तुमच्या सरकारने दिलेला कोट्यावधी रुपये हे योग्य त्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी लागावे ही आत्मिक अपेक्षा माझी तुमच्याकडून आहे. 

आदरणीय पंत तुम्ही मला एक खंबीर असे नेतृत्व प्रदान केलेतच परंतु यापेक्षाही खंबीर नेतृत्व तुम्ही यापुढे मला द्याल अशी अपेक्षा बाळगतो पंत जरा जास्तच बोललो असेल तर माफ करा परंतु पंत तुमच्यासारखा मित्र मला मिळाल्यामुळे माझ्या विकासात्मक भावना बळवल्या आहेत तुम्ही त्या पूर्ण करसाल त्यामुळेच या विचार पुष्पातून तथा लेखातून तुमच्यापर्यंत माझ्या मी व्यथा मांडत आहो. पंत इथे वैद्यकीय शिक्षण साठी तुम्ही एखादी मेडिकल कॉलेज देसाल अशी अपेक्षा बाळगतो.पंत इथं संस्कृतिक विकास तुम्ही करून द्याल अशी ही अपेक्षा बाळगतो. 

आदरणीय पंत इथे मी जिल्हा नावाचे कुंकू लावण्यास मी अनेक वर्षांपासून आसुसलेली आहे जसा चातक पक्षी पावसाची सारखी वाट बघतो  आदरणीय पंत माझा रेल्वे प्रश्न मार्गी लावतात यासाठीही मी तुमची वाट बघत आहे पण विकासात्मक दृष्टिकोनाच्या भावनेच्या भरामध्ये जरा जास्तच बोललो असेल तर मला माफ करा परंतु तुम्ही माझा विकास करा .तुम्ही माझा विकास करा.

लेखक विलास पाटील सूर्यवंशी..
मो 9922910080