Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.शा.सिंगारवाडी येथे बिटस्तरीय विद्यार्थी स्पर्धा सम्पन्नचिखली बु बिट अंतर्गत प्रा शा सिंगारवाडी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी सांगता वर्षाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी बीट स्तरीय


प्रा.शा.सिंगारवाडी येथे बिटस्तरीय विद्यार्थी स्पर्धा सम्पन्न

चिखली बु बिट अंतर्गत प्रा शा सिंगारवाडी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी सांगता वर्षाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी बीट स्तरीय समूहगायन,समूहनृत्य,पथनाट्य,नाटिका यांचे आयोजन करण्यात आले होते.


यामध्ये समूहनृत्य मध्ये प्रा शा सिंगारवाडीच्या विद्यार्थ्यांनी जय जय महाराष्ट्र माझा या गाण्यावर उपस्थित सर्वांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक सुध्दा सिंगारवाडीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य करत प्रेक्षकांची वाहवा मिळविली,तृतीय क्रमांक प्रा. शा.मलकवाडी 

यांच्या देशभक्तीपर नृत्याला व प्रा शा बेंदी तांडा यांनी सादर केलेल्या बंजारा नृत्याला  विभागून देण्यात आले.


समूह गायन स्पर्धेत प्रा.शा. बेंदी तांडा यांनी सादर केलेल्या गीताला प्रथम व सिंगारवाडी येथील पाळवदे माध्यमिक विद्यालयातील कदम यांना द्वितीय क्रमांक संपादित केले.
 

प्रा शा सिंगारवाडीच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर सादर केलेले पथनाट्य आजच्या स्पर्धेचे आकर्षण ठरले.
 विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,

पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर कदम,प्रधानसांगवी केंद्राचे केंद्रप्रमुख वैजनाथ काळे,चिखली बु केंद्राचे केंद्रप्रमुख ग.नु.जाधव,पाटोदा केंद्राचे केंद्रप्रमुख बाळकृष्ण वैद,मुखध्यपक रमेश आंधळे,धरणे,यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक चंद्रकांत मोरे,जमादार,जयस्वाल,बडे,नबी सर,श्रीमती बंडेवार आदींनी परिश्रम घेतले