युवा नेते सचिन नाईक स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविणार
०८३ किनवट ( नांदेड ) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किनवट/ माहूर विधानसभा मतदारसंघातील गाव,वाडी, तांड्याला भेटी देत दांडगा जनसंपर्क वाढविण्यासाठी सचिन नाईक हे सतत प्रयत्नशील आहेत असे पाहायला मिळतं आहे.
त्यामुळे माजी व आजी आमदारांवर खुप मोठी कसरत करण्याची वेळ आली आहे.
युवा नेते म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केलेले सचिन नाईक किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
नाईक यांनी माजी व आजी आमदारांवर विकास शुन्य म्हणून टिका करण्यास सुरुवात केली आहे.
भावी आमदार एकच नाईक सचिन नाईक अशी घोषणा नाईक यांचे समर्थक करतांना दिसून येतं आहे.
विशेषतः नाईक यांना गोरगरीब जनतेचा भक्कमपणे पाठिंबा मिळायला सुरुवात झाली असून त्याच बरोबर खेडे गाव विकास संघटना च्या चमूने सचिन नाईक यांनाच निवडून आणण्यासाठी धडपडताना दिसताहेत .
प्रथम लक्ष देईन ते प्रजाजनांच्या प्रकृतीस्वास्थाकडे , त्यासाठी आवश्यक स्वच्छतेचे कडे.
लहान मुलांना तरूण पिढीला ज्या प्रमाणे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आवश्यक आहे, तितकेच प्रो जनांचे प्रबोधनही आवश्यक आहे.
मला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेंव्हा तेंव्हा मी त्यांच्यात एक होऊन जाईन.
म्हणजे मि त्यांना परका वाटणार नाही.
त्यांच्या अडचणी ते मोकळ्या मनाने माझ्यापुढे मांडतील.
वेळोवेळी आयोजित केलेल्या अशा समारंभामुळे त्यांच्यातही ऐकोन निर्माण होईल
आणि मग बाहेरच्या कुठल्याही नतद्रष्ट व्यक्तीने त्यांच्यात फुट पाडण्यासाठी प्रयत्न केले तरीही त्यांना यश मिळणार नाही.
मि आमदार झालों तर प्रथम मि भ्रष्टाचार निपटून काढीन आज भ्रष्टाचाराविना काम होणे ही अशक्य गोष्ट झाली आहे.
या भ्रष्टाचारांशी झगडताना मध्येच आडवी येते ती बेकारी.
लाखों तरूण, माणसें बेकार आहेत, ती खेड्यांकडून शहराकडे धाव घेताना दिसतायत.
प्रत्येक गाव, तांडा,वाडी,खेड्याला रस्ते, पाणी व वीज मिळवून द्यायची ते खेडे गजबजते स्वंयपुर्ण करायचे हे माझे स्वप्न आहे .
आमदार झाल्यानंतर माझी वाटचाल त्या दिशेने असेल.