Ticker

6/recent/ticker-posts

धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण देण्यात येऊ नयेअशा आशयाचे निवेदन आज बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांना देण्यात आले


धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण देण्यात येऊ नये
अशा आशयाचे निवेदन आज बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांना देण्यात आले



धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण देण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदन बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने आज सहाय्यक जिल्हाधिकारी उपविभागीय कार्यालय किनवट यांच्यामार्फत भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू , भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी,


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,यांना महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या आदिवासी आरक्षणामध्ये धनगर अथवा कोणत्याही जातीचा समावेश न करण्याबाबत अशा आशयाचे निवेदन आज सहाय्यक जिल्हाधिकारी उपविभागीय कार्यालय यांच्यामार्फत आज बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने देण्यात आले.

 धनगर व धनगड या दोन भिन्न जाती आहेत त्यामुळे धनगरांना अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण देता येणार नाही असा स्पष्ट सविस्तर अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशिएल सायन्स ने महाराष्ट्र शासनाकडे दिलेला आहे असे असताना धनगरांना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे अशी मागणी अत्यंत चुकीची आहे

 असं बिरसा क्रांती दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच म्हणणं आहे त्याचबरोबर आदिवासी संस्कृती, परंपरा, राहणीमान ,जीवनशैली, भौगोलिक परिस्थिती, तसेच विशिष्ट भूप्रदेशात वास्तवात असलेल्या, व स्वातंत्र्य बोलीभाषा असलेला समाज आहे 

आदिवासी संस्कृती ही धनगर समाजाशी अजिबात मिळती जुळती दिसत नाही आदिवासी समाजाची रीती रिवाज, रुढी परंपरा, भाषा, जीवनशैली स्वातंत्र्य आहे. आदिवासी समाज व धनगर हे दोन वेगवेगळे समाज आहे

 आदिवासी समाजाचा व धनगर समाजाचा कुठल्याही बाबतीत ताळ मेळ बसत नसून आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासी बोगस जात पडताळणीचे दाखले घेत आदिवासींमध्ये घुसखोरी झालेली आहे खोट्या व बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर बोगस आदिवासी हे खऱ्या आदिवासीच्या लाखो नोकऱ्या बळकावल्या आहेत   

अशा एकूण 75 हजार बोगस कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देण्याचा निर्णय 29 नोव्हेंबर 2022 ला शासनाने घेतला आहे गैर आदिवासींनी अनेक क्षेत्रात आदिवासी आरक्षणाचा गैरफायदा घेतलेला आहे व घेत आहेत 

त्यामुळे आदिवासी समाजाच्या होणाऱ्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होत आहे आदिवासीच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करू नये अशा आशयाचे निवेदन आज  बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे 

अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिरसा क्रांती दल संघटनेच्या  वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिरसा क्रांती संघटनेच्या वतीने या ठिकाणी देण्यात आला आहे यावेळी जितेंद्र अनिलराव कुलसंगे जिल्हाअध्यक्ष बिरसा क्रांती दल नांदेड, 

प्रणय रमेश कोवे बिरसा क्रांती दल नांदेड जिल्हा मीडिया अध्यक्ष अशोक आबाराव सीडाम कार्याध्यक्ष बिरसा क्रांती दल नांदेड, ,मोहन लक्ष्मण कन्नाके मांडवी सर्कल अध्यक्ष

 ,श्रीमती सुरेखाताई घाटकर महिला तालुकाध्यक्षा, रमेश परचाके संपर्क प्रमुख बिरसा क्रांती दल नांदेड,,शैलेश मनोहर मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष बिरसा क्रांती दल नांदेड,संदीप दत्ता कन्नाके संघटक बिरसा क्रांतीदल नांदेड,

,बबलू मिरासे, पवन खराटे,संघटक ,संतोष पांडुरंग कनाके किनवट माहूर विधानसभा प्रभारी,श्रीमती जिजाबाई मेश्राम माजी नगरपरिषद सेविका किनवट ,

बालाजी सिडाम तालुकाध्यक्ष बिरसा क्रांती दल नांदेड मनीषा चौधरी महिला तालुका संघटक ,संजय विष्णू पेंदोर माहूर तालुका अध्यक्ष, 

अशोक नैताम किनवट माहूर संघटक, शोभा अनिल कुलसंगे सदस्य, पवन मडावी ,मधुकर मैश्राम आदींची या वेळी उपस्थिती होती