Ticker

6/recent/ticker-posts

श्रीक्षेत्र माहूर या तिर्थक्षेत्र विकासासाठी निधी मंजुर करा!नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट


श्रीक्षेत्र माहूर या तिर्थक्षेत्र विकासासाठी निधी मंजुर करा!

नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट!

माहूर:- साडे तीन शक्ती पिठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूरगड विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी राज्याचे उपमुखमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांची माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी 

यांनी आज मंत्रालयात भेट घेऊन माहूरगड विकासा साठी मंजूर आराखड्यातील निधी  उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी निवेदाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या टोकाला तेलंगणाच्या सीमावरती भागात असलेल्यामुळे माहूर शहरात पुर्वी ग्रामपंचायत असल्यामुळे आवश्यक विकास कामे झालेली नाहीत.

यापुर्वी मागील पंचवार्षीक मध्ये 234.00 कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र आराखडा मंजुर करण्यात आला होता. 

परंतु प्रत्यक्षात 20.00 कोटी रुपये एवढाच निधी प्राप्त झाला आहे. उर्वरीत निधी प्राप्त झाला नसल्यामुळे श्रीक्षेत्र माहूर या तिर्थक्षेत्राचा विकास थांबला आहे. 

तसेच गत आठवड्यात मराठवाडा विभागात छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या मराठवाडा विकासाच्या मंत्रीमंडळ बैठकीत सुध्दा श्रीक्षेत्र माहूर या तिर्थक्षेत्रासाठी निधी मंजुर करण्यात आलेला नाही.

राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांच्या तुलनेत माहूर गड विकास नगण्य असून रखडला असल्याने श्रीक्षेत्र माहूर ला तिर्थक्षेत्र विकासासाठी उर्वरीत निधी मंजुर करावा 

अशी मागणी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.

या शिवाय नवीन आराखडा मंजूर करण्यासाठी माहूरगड विकास संदर्भात स्वतंत्र बैठक लावण्याची मागणी सुद्धा नगराध्यक्ष फिरोज दोसानी

 यांनी अजित दादा कडे केल्याने त्यांनी लवकरच एक स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असे आश्वाशीत केले.