मा. हेमंतभाऊ पाटील साहेब खासदार हिंगोली लोकसभा.
व
मा. भीमराव केराम साहेब
आमदार किनवट/माहूर विधानसभा
🙏🙏 आपणास समाज माध्यमांवरून जाहीर विनंती
उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथून मला एका गरीब शेतकरी बंधूचा फोन आला. "माझ्या दीड वर्षाच्या मुलीची तब्येत खूप खराब आहे आपण लवकर या"...! माझे घर हॉस्पिटल पासून जवळच असल्यामुळे मी तिथे लगेच पोहोचलो मी तिथे गेलो असता डॉक्टरांना
त्या मुलीला प्राथमिक उपचार करून ऍडमिट करण्याची विनंती केली असता डॉक्टरांनी मला प्रांजळपणे सांगितले की इथे बालरोग तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे आम्ही या मुलीला ऍडमिट करून घेऊ शकत नाही.
त्यानंतर मी हॉस्पिटल अधीक्षक डॉक्टर घडसिंग साहेब यांना फोनवरून संपर्क केला असता त्यांनी येथील बालरोग तज्ञ हे मेळघाट येथे प्रतिनिक्ती वर गेलेले आहेत त्यामुळे येथे या मुलीचा इलाज होणार नाही असे त्यांनी सांगितले हे सर्व ऐकून सदर शेतकरी बंधू उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा
येथे मोठ्या अपेक्षेने आलेला जवळ मोजकेच पैसे असल्यामुळे त्याला धक्का बसला. परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही त्याला संदर्भ चिठ्ठी घेऊन आदीलाबाद येथे रवाना केले...
हे सर्व सांगण्याचा उद्देश इतकाच की, किनवट सारख्या दुर्गम आदिवासी बहुल भागात उपजिल्हा रुग्णालयात इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ञ नसणे हे किती गंभीर बाब आहे.
राज्य सरकार व केंद्र सरकार हे मोफत आरोग्य सुविधा देण्यासाठी आग्रही असताना ही दुरावस्था का?.. हे एक उदाहरण आहे. आशा रुग्णांच्या अनेक समस्या आहेत.
तेथे हॉस्पिटल प्रशासनाशी कर्मचारी वैद्यकीय अधिकारी उपलब्धतेत बाबत चौकशी केली असता अनेक महत्त्वाची पदे रिक्त किंवा डेपुटेशनवर असल्याचे समजले.
त्यामुळे आहेत त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. सोनोग्राफी हप्त्याला एकाच दिवशी चालू असते तर आत्ताच उदघाटन झालेली सिटीस्कॅन मशीन आणखी कार्यान्वीतच झाली नाही.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची तर याहून गंभीर अवस्था आहे. आरोग्य अधिकारी मुख्यालय हजर नसल्याच्या नियमित तक्रारी येत असतात. अनेक वर्षापासून किनवट येथे पूर्ण वेळ तालुका आरोग्य अधिकारी मिळालेले नाही.
तरी आपणास नम्र विनंती आहे की, गोर गरीब रुग्ण या हॉस्पिटलमध्ये मोठ्या आशेने येतात त्यांना पूर्ण आरोग्य सुविधा मिळण्यासाठी पुरेसा स्टाफ व सुविधा मिळण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करावे व हॉस्पिटल प्रशासन व रुग्ण यांच्यात समनव्यक दुवा साधण्यासाठी खासदार किंवा आमदार पुरस्कृत प्रतिनिधी नियुक्त करावा ही नम्र विनंती...
आपलाच
बबन वानखेडे
उपाध्यक्ष