Ticker

6/recent/ticker-posts

किनवट नगरपरिषद अंतर्गत समता नगर सुभाष नगर येथील नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे भर पावसाळ्यात दुर्गंधी उद्भउन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नालेसफाई संदर्भात नगर पालिका प्रशासनाला वारंवार लेखी निवेदन सादर करून ही दखल घेतली जात नाही


किनवट प्रतिनिधी
 किनवट नगरपरिषद अंतर्गत समता नगर सुभाष नगर येथील नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे भर पावसाळ्यात दुर्गंधी उद्भउन  नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नालेसफाई संदर्भात  नगर पालिका प्रशासनाला वारंवार  लेखी निवेदन सादर करून ही दखल घेतली जात नाही.

येत्या 8 दिवसाच्या आत या भागातील नालेसफाई  योग्य पद्धतीने झाली नाही तर  नागरिकांना सोबत घेऊन नगर पालीकेविरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाबाभाई यांनी दिला आहे.
 शहरातील समतानगर व सुभाषनगर भागाकडे किनवट नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असून पावसाळा पूर्व या भागातील नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने केलेली नसल्याने भर पावसाळ्यात येथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. 

गुत्तेदाराच्या सांगण्यावरून सफाई कामगार कधीतरी या भागात येऊन थातूरमातूर पद्धतीने नाल्यातील केर कचरा काढून मोकळे होतात.  

व्यवस्थितपणे नालेसफाई अभावी या भागातील नागरिकांना विविध  संसर्गजन्य आजाराची लागण होत आहे.

 या संदर्भात  नगरपालिका प्रशासनाला अनेकदा लेखी निवेदन सादर केले त्याच बरोबर अनेकवेळा तोंडी सांगितले पण  दखल घेतली जात नाही.

सध्या पावसाळ्यामुळे नाल्यातील घाण पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत असून नाल्यात गाळ साचून असल्याने डासाचे प्रमाण वाढले आहे.

समता नगर व सुभाष हा भाग दलित मुस्लिम बहुल असल्याने नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक या भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बाबाभाई यांनी केला. 

यावर्षी पहिल्याच पावसात समता नगर व सुभाष नगर भागातील प्रमुख रस्त्याच्या नाल्या तुडुंब भरून वाहिल्या. 

नाल्यातील गाळ व केर कचऱ्यामुळे अनेकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले. नालेसफाई व स्वच्छतेच्या नावाखाली 

किनवट नगरपरिषद  लाखो रुपयांचा खर्च करत असली तरी याचा फायदा समता नगर सुभाष नगर भागातील नागरिकांना न होता केवळ गुत्तेदाराला होत आहे. 

येथील दुर्गंधी व संसर्गजन्य आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता वेळोवेळी नाल्यांची योग्य पद्धतीने साफसफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा 

नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने नगरपालिका प्रशासनाविरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा  बाबाभाई यांनी दिला आहे.