Ticker

6/recent/ticker-posts

आमदार,खासदाराप्रमाणे स्थानिक विकास निधी ची मागणी करणारे ज्योत्स्ना जाधव हे पहिले सरपंच. किनवट l प्रतिनिधी. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकास साधायचा झाल्यास आमदार खासदाराप्रमाणे सरपंचांनाही स्थानिक विकास निधी उपलब्ध करून द्यावा


आमदार,खासदाराप्रमाणे स्थानिक विकास निधी ची मागणी करणारे ज्योत्स्ना जाधव हे पहिले सरपंच.
 किनवट l प्रतिनिधी. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकास साधायचा झाल्यास आमदार खासदाराप्रमाणे सरपंचांनाही स्थानिक विकास निधी उपलब्ध करून द्यावा 

अशा मागणीची निवेदन अंबाडी तांडा चे सरपंच ज्योत्स्ना कैलास जाधव आणि माजी सरपंच कैलास जाधव यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत जिल्हाधिकार्यालयात निवेदन दिले. 

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा अनुशेष भरून काढायचा झाल्यास सरपंचांना स्थानिक विकास निधी दिल्यास त्या गावाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही 

असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांना दिला. ग्रामपंचायत स्तरावर पंधरावा वित्त आयोग मार्फत विकास साधता येत असल्याच्या जिल्हाधिकारी 

यांच्या प्रश्नांना हा निधी अगदी तोडका पडत असल्याने मूलभूत सुविधा जसे की शाळा अंगणवाडी पाणीपुरवठा खेळाची मैदान शौचालय सारख्या उपाययोजनावर काम करणे अवघड होत असल्याची सरपंचांनी आपले मत व्यक्त केले. 

अशा विकासात्मक मागणीचे निवेदन राज्यातून देणारे किनवट तालुक्यातील एकमेव सरपंच सौ ज्योत्स्ना कैलास जाधव आणि 

माजी सरपंच कैलास जाधव असल्याचे दिसून येत आहे. यावर माननीय जिल्हाधिकारी महोदय काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.