Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहरात रविवारी आठवडी बाजारात जाताना मोबाईल चोरापासून सावधान...!!आठवडी बाजारात अट्टल सराईत मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे.



सदरील मुलगा किनवट भाजी मार्केटमध्ये मोबाईल चोरी करत असताना आज 4 वाजता पकडला आहे.

तो झारखंड येथील असल्याचे सांगत आहे. जर आज कुणाचा मोबाईल चोरी झाला असेल तर किनवट पोलीस स्टेशनची संपर्क साधावा.

किनवट शहरात रविवारी आठवडी बाजारात जाताना मोबाईल चोरापासून सावधान...!!

आठवडी बाजारात अट्टल सराईत मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे.

 या रविवारी दिनांक २ रोजी माझ्यासह ६ जणांचे मोबाईलवर चोरट्यांनी हात साफ केला. 

रस्त्याने चालताना गर्दीत मोबाइल खिशात ठेऊन बेसावध असाल, तर सावधान ! तुम्ही बेसावध असताना मोबाइल हिसकावून वा खिशातून काढून पळवून नेला जाण्याची शक्यता आहे.

 रस्त्यावरील दुचाकी चोरांनी थैमान घातले असताना सोबतच आता चोरट्यांनी मोबाइलकडे मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांत मोबाइल पळवण्याच्या घटनांनी इतर चोरीच्या घटनांना मागे टाकले आहे. 

रस्त्यावरून मोबाइलवर बोलत अथवा चॅटिंग करत चालत जाणाऱ्यावर पाळत ठेऊन थांबलेल्या व्यक्तीचे पूर्ण लक्ष मोबाइलवर असते. योग्य संधीचा फायदा घेऊन चोरटे खिशातील मोबाइल काढून पसार होतात. थोडी सतर्कता बाळगून आपण मोबाईल चोरीच्या मनस्तापातून वाचू शकतो....
 
असो - मोबाईल चोरट्यांच्या कृपेने दोन दिवसाचा मोबाईल व सोशल मीडियाचा उपवास तरी घडला...!!