किनवट तालुक्यातील गोकुंदा शहरात ज्येष्ठ विधीज्ञ यांच्या घरी धाडसी चोरी.
किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट पासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटरवर असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजे गोकुंदा शहरात धाडसी चोऱ्याचे सत्र सुरूच आहे.
गोकुंदा शहर या नात्याकारणाने कायदा व सुव्यवस्थेचा समस्या निर्माण होत असतात त्यापैकीच एक नामांकित ज्येष्ठ विधीज्ञ श्री सुभाष ताजने
यांच्या घरी दिनांक 10/10/2023 च्या रात्री अंदाजे एक ते तीनच्या दरम्यान धाडसी चोरी झालेली आहे अज्ञात चोरट्याने अंदाजे दोन लाख सोळा हजार रुपयाचा ऐवज लंपास केला.
"विधीज्ञ" हे भारतीय पवित्र न्याय व्यवस्थेचा "विधी अधिकारी" ( law officer) म्हणून गणल्या जातो विधी अधिकाऱ्याच्याच घरी जर चोऱ्या होत
असतील तर सर्वसामान्य माणसाची काय या गंभीर बाबीवर आज किनवट शहरांमध्ये तथा गोकुंदा शहरामध्ये तथा परिसरामध्ये बोलल्या जात आहे त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे
लोक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत व पुनश्च किनवट पोलीस प्रशासनावर कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षेच्या बाबतीत शंकेच्या नजरेने ते पहात आहेत.
हे गतिमान व कर्तव्यदक्ष पोलिस प्रशासना साठी लाजिरवाणी बाब आहे..
सदर घटनेची गंभीरित्या दखल घेऊन ॲड सुभाष ताजने
यांच्या फिर्यादी वरून पोलीस निरीक्षक साहेब यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 241/ 2023.. दुपारी 2 वाजून 18 मिनटानी नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेब यांच्या आदेशाने पोलीस करत आहे