किनवट तालुक्यातील किनवत भाजी मार्केटआणि आस पास मध्य चालु मटका बाजार पत्ते क्लब आणि पिंपळगाव फाटा येथील जुगार अड्डा बंद करण्याची मागणी
किनवट l प्रतिनिधी. तालुक्यातील पिंपळगाव फाटा हे मराठवाडा विदर्भ तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या चौफुलीवरील गाव. राज्यमार्गाच्या रोडवरील पिंपळगाव फाटा हे अवैद्य धंद्याचे प्रमुख अड्डा बनला असल्याने
येथे तेलंगणाच्या आदीलाबाद, विदर्भाच्या यवतमाळ आणि मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्याच्या काही तालुक्यातील तरुण युवक बेरोजगार छोटे मोठे व्यापारी यांची येथे जुगार मटका खेळण्याच्या साठी मोठी वर्दळ पाहावयास मिळते.
अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडवी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याचे इकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. पोलीस उपविभाय अधिकारी हा जुगार अड्डा बंद करण्यात अपयशी ठरले असल्याचे दिसून येते..
माजी मंत्री माजी खासदार एक उत्कृष्ट संसद पटू अशी ओळख असणाऱ्या उत्तमराव राठोड यांच्या नावाने मांडवी पंचक्रोशी ओळखली जाते.
मात्र आज मटका, जुगार मांडवी पिंपळगाव असा शब्दप्रयोग होताना दिसून येत असल्याने मनाला अचंबित होते. पिंपळगाव हे राज्य मार्गावरील व विदर्भ तेलंगणाच्या मुख्य रस्त्यावर असल्याने
येथे आदिवासी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या साठी आश्रम शाळा केंद्र सरकारची मान्यता असलेले मुलीचे शैक्षणिक संकुल जिल्हा परिषद शिक्षण विभागाची सातवीपर्यंतची शाळा, पेट्रोल पंप, वन विभागाचा तपासणी नाका अशी केंद्र व राज्य शासनाची महत्त्वाची आस्थापने असल्याने
या विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी पालक या वर्गावर या अवैद्य जुगार, खेळण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीकडून काही प्रमाणात कुचंबना होताना दिसून येत आहे.
हे अवैद्य व्यावसायिक तेलंगणा विदर्भातून येऊन येथे अवैद्य धंद्याचे अड्डे बनविल्याने गाव खेड्यातला युवक, शेतकरी, कास्तकार या वाम मार्गाला लागून
आपले आयुष्य बरबाद करून कौटुंबिक कलहातून गुन्हेगारीकडे वळत असल्याची चिंता या परिसरातील सजग शेतकरी , सुशिक्षित महिला पुरुष वर्गातून व्यक्त होताना दिसून येत आहे.
ही अवैद्य धंदे तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बंद न केल्यास अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग किनवट आणि जनशक्ती संघटना किनवट च्या वतीने अवैद्य धंद्याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडणार असल्याच्या