मयत मारोती सोमला राठोड यांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल _ मदनापुर गांवकरी
०८३ किनवट ( नांदेड ) मौजे मदनापुर ( चि ) येथील नामे मारोती सोमला राठोड यांचा दि. १४ /१०/२०२३ रोजी आरोपीच्या शेतात विद्युत तारेला शाक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
मौजे मदनापुर शिवारातील दत्ता संभाजी केंद्रे व गजानन संभाजी केंद्रे यांनी त्यांच्या वहीती करत असलेल्या मक्याच्या शेतात जंगली प्राण्यांसाठी विद्युत तार टाकल्यामुळे
या तारेला स्पर्श होऊन मारोती सोमला राठोड यांचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी मयताचे मोठा भाऊ शिवाजी सोमला राठोड
यांनी पोलिस स्टेशनमध्ये लेखी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करायला पाहिजे होती पण पोलिसांना अपयश आले आहे.
आरोपींवर कलम ३०४ व ३४ प्रमाणे गुन्हे दाखल झाले असून आज मितीस तीन दिवस लोटले तरी पोलिसांनी आरोपींना अद्यापही अटक केली नाही.
पोलिस या प्रकरणातील आरोपींना अभय देत असल्याने ते फरार आहे असे गावकऱ्यांचे म्हणने आहे.
या आरोपींना ४८ तासात अटक न केल्यास मयत मारोती सोमला राठोड यांना न्याय मिळवून देण्यासाठी समस्त गावकऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन समस्त गावकरी मंडळी
यांनी मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, मा. पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड, मा.उपविभागीय पोलिस कार्यालय किनवट,