Ticker

6/recent/ticker-posts

*जारंगे पाटील यांच्या उपोषणास किनवट अभिवक्ता संघाच्या सदस्यांचा जाहीर पाठिंबा...* किनवट ( तालुका प्रतिनिधी) आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले व ते उच्च न्यायालयात टिकवले होते


*जारंगे पाटील यांच्या उपोषणास किनवट अभिवक्ता संघाच्या सदस्यांचा जाहीर पाठिंबा...* 

किनवट ( तालुका प्रतिनिधी) आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले व ते उच्च न्यायालयात  टिकवले होते ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता म्हणजे सरकार असताना रद्दबातल झाले व सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार या नेत्यांच्या  सहाय्याने  मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांनी म्हणजेच यांच्या सरकारने मराठा आरक्षण संदर्भात क्यूरयाटीव पिटीशन दाखल केली आहे 

ती सुप्रीम कोर्टाने नोंदवून घेतलेली आहे तसेच मध्यंतरी सर्व महाराष्ट्र जाणतो की आदरणीय जरांगे पाटील यांनी सर्व मराठ्यांना कुणबी मराठा आरक्षण देऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा जेणेकरून सामाजिक ,

 शैक्षणिदृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या मराठा समाजाला समान पातळीवर आणता येईल व संविधानाचा उद्देश साध्य होईल यासाठी जारंगे पाटील यांनी जे उपोषणाचे हत्यार शासनाच्या विरोधात उपोसले त्या उपोषणास जाहीर पाठिंबा किनवट येथील अभीवक्ता संघाच्या सदस्यांनी वैयक्तिकरित्या जाहीर केलेला आहे. 

किनवट येथे जारंगे पाटील यांच्या उपोषणाला साखळी उपोषण म्हणून बोरगाव येथील गावकऱ्यांचे उपोषण चालू असताना त्या उपोषणाच्या जागी जाऊन अभिव्यक्त संघाचे अध्यक्ष ॲड आर डी सोनकांबळे, तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ज्युनिअर विधिज्ञ यांनी  जाहीर पाठिंबा दर्शवला आहे

 सदर पाठिंबा दर्शवत असताना आदरणीय ज्येष्ठ विधीज्ञ माजी अध्यक्ष श्री ॲड.अरविंद चव्हाण साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना मी बंजारा समाजाचा असून 

मी माझ्या मंडळाचा तसेच मी माझ्या गावातील एक नायक आहे एक प्रमुख आहे तसेच आरक्षण अभ्यासक श्री हरिभाऊ राठोड यांच्या व जारंगे पाटील

 यांच्या आरक्षण संदर्भातील भेटी विषयी  सांगितले व मी माझ्या नायक या नात्याने मराठा आरक्षणास माझा वैयक्तिकरित्या संपूर्ण पाठिंबा आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न शासनाने त्वरित सोडवावा 

अशी मी या ठिकाणी शासनाला सूचना वजा विनंती करीत आहे असे त्यांनी सांगितले . यावेळेस आदरणीय जेष्ठ विधीज्ञ श्री ॲड.ताजणे साहेब. ॲड.सुर्यवंशी साहेब ॲड.कुरेशी साहेब, 

ॲड.पंकज गावंडे साहेब ॲड.शिरपुरे साहेब (सचिव) ॲड.टेकसिंघ चव्हाण साहेब , ॲड. मुसळे साहेब, इत्यादी सदस्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे..