Ticker

6/recent/ticker-posts

अवैध धंद्यांकडे पोलिसांची डोळेझाक : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज किनवट, दि. २५ : अनेक दिवसांपासून शहर आणि तालुक्यात अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांना उत आला आहे.


अवैध धंद्यांकडे पोलिसांची डोळेझाक : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

 किनवट, दि. २५ : अनेक दिवसांपासून शहर आणि तालुक्यात अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांना उत आला आहे. पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही. 

त्यामुळे आता तालुका प्रशासनातर्फे कर्तव्यदक्ष सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनीच यात हस्तक्षेप करून अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

तालुक्यात जुगार, मटका, गावठी दारू तथा अवैधरित्या देशी दारुची  सर्रास विक्री सुरु आहे. विशेषतः शहरातील काही विशिष्ट भागांमध्ये असे धंदे खुलेआम चालविले जातात. 

एवढेच नाही तर काही ठिकाणी पोलिस ठाण्याच्या व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या काही मीटर अंतरावरच अवैध धंदे सुरु असतानाही त्याकडे पोलिसांची डोळेझाक होत आहे. 

या अवैध धंद्यांच्या माध्यमातून हप्तेही वसुल केले जात असल्याची चर्चा आहे. 

परिणामी अशा अवैध धंद्यांमुळे नागरिकांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होवून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे.
|| शहरातील बसस्थानक परिसरात महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले 

यांचे पुर्णा कृती पुतळे आहेत.या पुतळ्याजवळच मटका अड्डा सुरू आहे.हा मटका अड्डा ३ जानेवारी पर्यंत बंद करण्यात यावा,अन्यथा या पुळ्याजवळ ३जानेवारी पासून "सेक्युलर मुव्हमेंट",या सामाजिक संघटनेकडून साखळी उपोषणात करण्यात येईल ,

असा इशारा या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड.एम.यु.सर्पे यांनी एका निवेदनाद्वारे सर्व संबंधितांना दिला आहे.||