Ticker

6/recent/ticker-posts

आपलं किनवट या पुस्तकाचे प्रकाशन किनवट येथील सरस्वती कॉलनी मधील रस्त्यांच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी हिंगोली लोकसभा खासदार श्री हेमंत पाटील व किनवट तहसीलदार व न्यायदंडाधिकारी श्रीमती मृणाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले

या प्रसंगी ते म्हणाले की प्रा. संतोष पवार यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून 

या परिसराचा अभ्यास केला तीन वर्ष सतत अनेक ऐतिहासिक स्थळांना  तसेच विविध व्यक्तींना सांस्कृतिक कार्यक्रमांना भेटी देऊन हे ऐतिहासिक संशोधनात्मक अवघड कार्य पूर्ण केलेले आहे

 या पुस्तकांमधून भावी पिढीला  किनवट चा सामाजिक राजकीय शैक्षणिक  सांस्कृतिक दळणवळणअशा अनेक घटकाबद्दल परिपूर्ण अशी माहिती मिळणार आहे

 या पुस्तकातून नवीन पिढीला प्रेरणा मिळणार आहे  या कार्यक्रमा प्रसंगी प्रकाशक श्री. बालाजी तोटेवाड तसेच शिवसेना तालुका अध्यक्ष बालाजी मुरकुटे, 

शिवसेना शहर प्रमुख सुरज सातुरवार, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील तसेच सर्व शिवसैनिक कार्यकर्ते हजर होते

 या सर्वांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला किनवट परिसरा बद्दलची सविस्तर माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे