किनवट ता. प्र दि ०६ तालुक्यात शासकीय नियमानुसार पतपुरवठा करणा-या संस्थांच्या निष्क्रीयतेमुळे खाजगी शावकारी व अवैध धंधे अवैध भिसी चालकांकडुन लहान व्यापारी व शेतक-यांची आर्थिक फसवणुक, लुबाडणुक होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असुन
या विरुध्द शासनाने कारवाई करण्याची मागणी राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड व शिवसेना (उ.बा.ठा) तालुका प्रमुख मारोती दिवसे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना केली आहे.
किनवट तालुक्यात अवैध शावकारी व अवैध धंधे अवैध भिसी चालकांनी थैमान घातला असुन ग्रामिण व दुर्गम भागात असलेल्या किनवट तालुक्यात शिक्षणाची टक्केवारी अत्यल्प असल्याने
येथे निरक्षर नागरीकांची संख्या जास्त आहे. याच बाबीचा फायदा घेऊन हे अवैध धंधे अवैध भिसी चालक व अवैध शावकारी करत नागरीकांची आर्थिक पिळवणुक करत आहेत.
राज्यात माजी गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी अवैध शावकारी विरोधात मोहिम काढली होती.
त्यामुळे अनेक नागरीकांची शावकारी पाषाणातुन मुक्तता झालेली होती.
परंतु दरम्यानच्या काळात आलेल्या विविध राज्यसरकारच्या दुर्लक्षामुळे अवैध शावकारी व अवैध धंधे अवैध भिसी चालकांचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात फोफावला असुन
याकडे राज्य शासनाच्या सहकार आयुक्त व सहकारी संस्था नोंदणी निबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी लक्ष दिले पाहिजे.
जेणे करुन अशा अवैध धंदे करणा-यांना कायदा करता येईल. शासनाच्या या विभागाने दाखवलेल्या निष्क्रीयतेमुळे शेतकरी व नागरीकांना या अवैध धंदे चालकांच्या तावडीत सापडण्याची वेळ आली आहे.
तरी या विरुध्द आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रावादी कॉग्रेस पक्ष व शिवसेना उ.बा.ठा यांनी या विरुध्द आंदोलन करण्याची भुमिका घेतली आहे.
तरी अवैध शावकारी व अवैध धंधे अवैध भिसी चालकांच्या तावडीत व आर्थिक पिळवणुकीत सापडलेल्या नागरीकांना सहकारी संस्था नोंदणी निबंधक कार्यालयाला संपर्क साधुन संबधिता विरुध्द रितसर तक्रार दाखल करण्याचे आवाहन